News Flash

पाहाः ‘धूम ३’च्या टायटल ट्रॅकमध्ये कतरिनाचे जलवे

गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता 'धूम ३'चे टायटल ट्रॅक प्रदर्शित करण्यात आले.

| November 15, 2013 11:10 am

आगामी लक्षवेधी ‘धूम ३’ चित्रपटातील पहिले गाणे यशराजने प्रदर्शित केले आहे. आमिरने जाहीर केल्याप्रमाणे सचिनला हे गाणे अर्पित करण्यात आले आहे. गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता ‘धूम ३’चे टायटल ट्रॅक प्रदर्शित करण्यात आले. युट्युबवर हे गाणे प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्यास लगेचच शेअर करण्यास सुरुवात केली.
सचिनसाठी आमिरची खास भेट

गाण्याच्या सुरुवातीला ‘धूम’च्या पहिल्या दोन भागातील गाण्याची झलकही पाहण्यास मिळते. कतरिनावर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे अदिति सिंहने गायले असून प्रीतमने यास संगीत दिले आहे. याआधी ऐश्वर्या राय, ईषा देओल आणि टाटा यंग यांनी धूमचे टायटल ट्रॅक केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 11:10 am

Web Title: watch katrina kaif sizzle as the new dhoom machale girl
टॅग : Katrina Kaif
Next Stories
1 ‘बुलेट राजा’बरोबर ‘देढ इश्किया’चे ट्रेलर
2 कथा दिव्याखालच्या अंधाराची
3 पुढच्यावेळी मॅचिंग बिकनी घालीन – कतरिना कैफ
Just Now!
X