बॉलीवूड अभिनेत्री नरगिस ‘फक्रीचे फटा पोस्टर निकला हिरो’ चित्रपटातील चर्चेत असलेले आयटम साँग अखेर प्रदर्शित झाले आहे. ‘मद्रास कॅफे’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत असलेल्या नरगिसने ‘ढटिंग नाच’ या आयटम साँगवर ठुमके लावले आहेत.
या गाण्यात नरगिस चित्रपटातील मुख्य अभिनेता शाहिद कपूरसोबत लटके-झटके मारताना दिसत आहे. या गाण्यातून दोघांचाही जबरदस्त नृत्याविष्कार पाहण्यास मिळत आहे. ‘ढटिंग नाच’ गाणे अमिताभ भट्टाचार्यने लिहले असून नकाश अझिझ आणि नेहा कक्कड यांनी गाणे गायले आहे.
शाहिद आणि इलयाना डिक्रुझची मुख्य भूमिका असलेला दिग्दर्शक राजकुमार संतोषीचा ‘फटा पोस्टर निकला हिरो’ २० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Sep 2013 रोजी प्रकाशित
पहाः नरगिस फक्रीचे ‘ढटिंग नाच’ आयटम साँग
'मद्रास कॅफे' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत असलेल्या नरगिसने 'ढटिंग नाच' या आयटम साँगवर ठुमके लावले आहेत.
First published on: 02-09-2013 at 06:06 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch nargis fakhris item song dhating naach from phata poster nikhla hero