रणबीरने ‘बेशरम’ चित्रपटात गायलेले ‘लव्ह की घंटे गाणे’ प्रदर्शित झाले आहे. रणबीरवर चित्रीत झालेल्या या गाण्यात तो मजा-मस्ती करताना दिसत आहे. या गाण्यात रणबीर त्याच्या मित्राला स्वतःची प्रेमकथा सांगत असून चित्रपटातील हिरोइन पल्लवी शारदाला प्रेमयाचना करताना दिसतो. या गाण्यास रणबीर, सुजीत शेट्टी आणि अमितोष नागपाल यांनी स्वतः गायले आहे.
हे गाणे गाण्यासाठी रणबीरची केलेली निवड योग्य असल्याचे मत चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनव कश्यपने व्यक्त केले. रणबीर कपूरशिवाय या चित्रपटात पल्लवी शारदा, ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्यासुद्धा भूमिका असून, हा चित्रपट २ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.