News Flash

पाहाः ‘तू ही तो है’ गाण्यात ‘खिलाडी’ सोनाक्षी

बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची प्रमुख भूमिका असलेल्या हॉलीडे चित्रपटातील 'तू ही तो है' गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.

| April 14, 2014 02:26 am

बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची प्रमुख भूमिका असलेल्या हॉलीडे चित्रपटातील ‘तू ही तो है’ गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. यात सोनाक्षी खेळाडू मुलगी तर अक्षय कुमार तिला रिझवू पाहणा-या एकतर्फी प्रेमात पडलेल्या प्रियकराच्या भूमिकेत दिसत आहे.
तू ही तो है हे रोमॅण्टिक गाणे इरशद कामिलने लिहले असून, त्यास बेनी दयाल स्वरबद्ध केले आहे. या गाण्यात सोनाक्षी रग्बी, नंतर टेनिस आणि बॉक्सर अशा खेळाडू रुपात दिसते. तर दुसरीकडे अक्षय कुमार तिला आपल्या प्रेमात पाडण्याच्या प्रयत्नात दिसतो. २०१० साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासून सोनाक्षीवर एकाच त-हेच्या भूमिका आणि लूकसाठी टीका केली जात होती. मात्र, या गाण्यात ती साडी किंवा ड्रेसमध्ये न दिसता अॅथलेटिक कॉलेज मुलीच्या रुपात दिसत आहे. सदर गाण्याची लिंक ट्विट करत सोनालीने म्हटले की, हॉलीडे चित्रपटातील तू ही तो है गाणे. मला माझ्या शाळेतल्या दिवसांची आठवण झाली.

तमिल चित्रपट ‘थुप्पक्की’ चा रिमेक असलेल्या हॉलीडे चित्रपटात गोविंदा सहायक कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. हा चित्रपट ६ जूनला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 2:26 am

Web Title: watch sporty sonakshi sinha in tu hi to hai from holiday
Next Stories
1 फोटो अल्बम : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगची ‘संडे डिनर डेट’
2 ‘फँड्री’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!
3 आहे गॉडफादर म्हणून..
Just Now!
X