News Flash

video: ओरिजनल बचपन का प्यार ऐकलत का?

सहदेवचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सर्च केला ओरिजनल व्हिडीओ...

bachpan ka pyaar
सहदेवचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सर्च केला ओरिजनल व्हिडीओ...

सोशल मीडियावर ‘बचपन का प्यार’ हे गाणं सध्या व्हायरल होताना दिसत आहे. ‘बचपन का प्यार’ या गाण्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत जो मुलगा आहे त्याच नाव सहदेव दिरदो आहे. सहदेवचा हा व्हिडीओ २०१९ मधला आहे. सहदेवच्या शाळेतील एका शिक्षकाने हा व्हिडीओ शेअर केला होता. आता या गाण्याचे पंजाबी, भोजपूर आणि अनेक भाषांमध्ये व्हर्जन सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मात्र, सहदेवने गायलेल्या या गाण्याचं ओरिजनल गाणं कोणतं आहे याबद्दल अनेकांनी सर्च केलं आहे.

‘बचपन का प्यार’ हे गाणं सहदेवने त्याच्या बाजूला राहणाऱ्या एका व्यक्तीच्या फोनवर ऐकलं होतं. याचं मुळ गाणं हे कमलेश बरोट यांच आहे. कमलेश हे गुजरातमधील आदिवासी लोकगायक आहेत. २०१८ मध्ये पी.पी बरिया यांनी या गाण्याची रचना केली होती. तर मयूर नदिया यांनी या गाण्याला संगीत बद्ध केलं आहे. त्यानंतर २०१९ मध्ये या गाण्याचे कॉपीराइट्स हे मेशवा फिल्मसला विकण्यात आले होते. त्यानंतर मेशवा फिल्मसने त्यांच्या युट्यूब चॅनलवरून याचा म्युजिक व्हिडीओ शेअर केला. सहदेवने ‘बचपन का प्यार’ हे गाणं गायल्यानंतर मेशवा फिल्मसचं हे गाणं सर्च करण्यात आलं. या गाण्याला आतापर्यंत ५८ लाखांपेक्षा जास्त व्हिव्यूज मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by BADSHAH (@badboyshah)

आणखी वाचा : अपारशक्ती खुरानाचा ‘बचपन का प्यार’ गाण्याच्या पंजाबी व्हर्जनवर डान्स, व्हिडीओ व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by BADSHAH (@badboyshah)

दरम्यान, हे गाणं गाणारा हा सहदेव छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातल्या छिंदवड या छोट्या गावात राहतो. त्याचे वडील खूप गरीब आहेत. त्याच्या घरात ना फोन ना टीव्ही आहे. मात्र, एक गाणं गायल्यानंतर सहदेवने इंटरनेटवर धुमाकुळ केला. सेलिब्रिटींपासून नेटकऱ्यांपर्यंत आज प्रत्येकाच्या तोंडात हे गाणं आहे. सगळेच या गाण्यावर रील शेअर करताना दिसतं आहेत.

आणखी वाचा : ‘एक आई म्हणून विनंती करतेय…’; राज कुंद्रा प्रकरणी शिल्पा शेट्टीनं मांडली भूमिका

सहदेवचं हे गाणं सगळ्यात आधी रॅपर आणि सिंगर बादशाहने शेअर केलं होतं. सहदेवच्या घरी फोन नसल्याने बादशाहने सहदेवच्या शेजाऱ्याच्या फोन नंबर मिळवला आणि त्याला संपर्क करून सहदेवशी फोनवर बोलला. लवकरच सहदेव बादशाहसोबत एक गाणं गाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2021 6:46 pm

Web Title: watch the original video of bachpan ka pyaar dcp 98
टॅग : Entertainment
Next Stories
1 Video: मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांच्याशी दिलखुलास गप्पा
2 नेटकऱ्याने विचारले ‘तू व्हर्जिन आहेस का?’ सलमानचे उदाहरण देत टायगर म्हणाला..
3 ‘बाजिंद’ म्हणजे काय?; उभ्या महाराष्ट्राला पडलाय प्रश्न, पाहा Google ची आकडेवारी
Just Now!
X