News Flash

VIDEO : बिग बी ऐश्वर्याला म्हणतात, ‘आराध्यासारखे वागू नकोस’

...आणि ती उत्साहीपणे व्यक्त झाली.

अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन

सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्यात एकमेकांसोबत कसे वागत असतील? रुपेरी पडद्यावर एकमेकांसोबत काम करणाऱ्यां या कलाकार मंडळींचे समीकरण पडद्यामागे नेमके कसे असते हे जाणून घेण्यासाठी अनेकांना कुतूहल असते. त्यातही काही सेलिब्रिटींवर, त्यांच्या कुटुंबावर चाहत्यांच्या विशेष नजरा असतात. अशाच काही सेलिब्रिटी कुटुंबांपैकी एक म्हणजे बच्चन कुटुंबीय. या सेलिब्रिटी कुटुंबातील सून ऐश्वर्या राय बच्चन आणि सासरे महानायक अमिताभ बच्चन यांच्या नात्याची सुरेख बाजू नुकतीच पाहायला मिळाली.

एका पुरस्कार सोहळ्यातून बाहेर येताना पत्रकारांनी अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्याला गाठले. यावेळी ऐश्वर्या आणि बिग बी या दोघांनाही पुरस्कार मिळाले होते. या सर्व उत्साही वातावरणात ज्यावेळी बिग बी आपल्याकडेच येत आहेत हे ऐश्वर्याने पाहिले आणि ती उत्साहीपणे व्यक्त झाली. अमितजी खूप चांगले आहेत….’ही इज द बेस्ट’, असे म्हणत तिने त्यांना मिठीच मारली. तेव्हा बिग बींनीसुद्धा आपल्या सुनेला अगदी अनोख्या अंदाजात दटावत म्हणाले, ‘आराध्यासारखे वागू नकोस’.

वाचा : ‘जब वी मेट’मधील गीतचा प्रियकर आठवतोय…

अर्थात असे म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य काही केल्या लपू शकले नाही. अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या नात्यातील ते सुरेख क्षण पाहून अनेकांनाच त्यांचा हेवा वाटला. आपल्या कुटुंबात सर्वजण कलाकार असून, आराध्यासुद्धा त्याच वळणावर जातेय, असे खुद्द बिग बींनी यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे आपल्या नातीविषयी असलेले त्यांचे प्रेम पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2017 12:38 pm

Web Title: watch video bollywood actor big b amitabh bachchans says stop behaving like aaradhya to daughter in law actress aishwarya rai bachchan
Next Stories
1 ‘या’ देशात हनिमूनला गेलेत ‘विरुष्का’
2 गुपचूप गुपचूप
3 बिनधास्त बोल!
Just Now!
X