News Flash

“सर्वांना ब्रेक हवाच होता, पण…”; रिंकूने व्यक्त केली खंत

देशभरातला लॉकडाउन पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे.

रिंकू राजगुरू

देशभरातला लॉकडाउन पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. आता १७ मे पर्यंत देशभरात लॉकडाउन पाळला जाणार आहे. जवळपास गेल्या दीड महिन्यापासून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण आपापल्या घरीच आहेत. “सर्वांना ब्रेकची गरज होती, पण असा ब्रेक नको होता”, अशा शब्दांत ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने खंत व्यक्त केली आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “सर्वांना ब्रेकची गरज होती, पण असा ब्रेक कोणालाच नको होता. माणूस म्हणून आपण कुठे थांबायला पाहिजे, हे सर्वांनाच माहीत असायला पाहिजे होतं. ही परिस्थिती आपल्याला बरंच काही शिकून जाईल अशी अपेक्षा आहे. लॉकडाउनमुळे मला बऱ्याच गोष्टी नव्याने करण्याची संधी मिळाली आहे.”

आणखी वाचा : अन् त्याने विचारलं ऑडिशन देते का?…असा सुरू झाला ‘सैराट’मधील आर्चीचा प्रवास

रिंकू लॉकडाउनमध्ये घरी स्वयंपाक, चित्रकला यांमध्ये रमली आहे. ती घरकामात आईला मदतसुद्धा करतेय. सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात आहे. नुकतीच तिची पहिली वेब सीरिज ‘हंड्रेड’ प्रदर्शित झाली. या वेब सीरिजमध्ये तिने ब्रेन ट्युमर झालेल्या मुलीची भूमिका साकारली आहे. लवकरच ती बॉलिवूड चित्रपटातसुद्धा झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 2:54 pm

Web Title: we needed a break but not in this way says sairat fame rinku rajguru ssv 92
Next Stories
1 ‘आमच्या कथेचा अंत झाला’; ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू भावूक
2 ऋषी कपूर यांच्या संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क!
3 WWE सुपरस्टार जॉन सीनाने ऋषी कपूर यांना वाहिली श्रद्धांजली
Just Now!
X