15 December 2019

News Flash

ब्रँडवाले..

प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या ‘हंसगामिनी’ या फॅ शनब्रँडचं नुकतंच प्रदर्शन भरलं होतं.

|| गायत्री हसबनीस, भक्ती परब

नाटक, चित्रपट, मालिका आणि अलीकडे वेबसीरिज या माध्यमांमध्ये भूमिका करताना तारेवरची कसरत करणारे, मुंबई-पुणे, मुंबई -नाशिक, गावातून शहराकडे असा प्रवास करणारे मराठी कलाकार सध्या विविध माध्यमांतून काम करतानाच फॅ शन क्षेत्रात आत्मविश्वासाने पाऊल टाकत आहेत. काही कलाकारांनी फॅ शनमधील आपली रुची अधिक वाढवत स्वतचे फॅ शनब्रँड्स काढले आहेत. एकीकडे अभिनयातली व्यावसायिकता जोपासताना दुसरीकडे फॅ शनमध्येही कल्पकतेने व्यावसायिकता आणणारे हे कलाकार ठळकपणे समोर येत आहेत. निवेदिता सराफ, तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे, आरती वडगबाळकर, अथर्व चव्हाण अशा अनेक कलाकारांचे फॅशन ब्रँड्स सध्या चर्चेत आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या ‘हंसगामिनी’ या फॅ शनब्रँडचं नुकतंच प्रदर्शन भरलं होतं. योग्य दरात डिझायनर साडय़ा अशी त्यांच्या फॅ शनब्रँडची संकल्पना आहे. कलमकारी, अज्रक या कॉटन मटेरिअलमधल्या साडय़ा मी डिझाइन करते. तसेच इरकल साडय़ा विविध प्रकारात करते. काही कपडय़ांवर डिझाइन प्रिंट करून घेते. बरीच वर्षे मी स्वत: प्रिंट आणि डिझाइन करत होते. हा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी समाजमाध्यमांचा वापर करते. मला स्वतला साडय़ा नेसायला खूप आवडतं. डिझायनर साडय़ा सर्वाना परवडतील अशा दरात आणि क्लासी दिसतील, अशा पद्धतीने उपलब्ध करून देणे हा विचार त्यामागे असतो असं निवेदिता यांनी सांगितलं. प्रदर्शन आणि संकेतस्थळाचा वापर करून त्याची विक्री करण्यावर निवेदिता यांचा भर असतो.

शेवंताच्या भूमिकेमुळे सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा दागिन्यांचा ब्रँड आहे. त्याची सुरुवात कशी झाली हे सांगताना ती म्हणाली, मी सतत दागिन्यांमध्ये प्रयोग करतच होते. माझ्या सख्ख्या बहिणीच्या लग्नातही मी सोन्याच्या दागिन्यांवर प्रयोग केला होता. त्यानंतर मी आरेखन करायला सुरुवात केली. पुढे मी प्रदर्शनं भरवण्यास सुरुवात केली. मला स्वत:ला ड्रॉइंगची खूप आवड आहे. त्यामुळे यात जास्त प्रमाणात हात बसत गेला, असं तिने सांगितलं. कलाकार असल्याने एक काम संपल्यावर दुसरे काम ताबडतोब मिळेल की नाही याची खात्री नसते. तो मधला काळ आपल्याकडे असतो. त्यामुळे त्या कालावधीत काहीतरी करणं गरजेचं आहे. मी माझं मनं रमतंय म्हणून स्वतंत्र ज्वेलरी कलेक्शन सुरू केलं, असं तिने सांगितलं. यामध्ये मोठी स्पर्धा आहे. पण अभिनेत्री म्हणून ओळखीचा चेहरा असल्याने लोकांच्या आपण आठवणीत राहतो. मी माझ्या कलेक्शनला माझेच नाव दिल्याने लोकांना ओळखायला आणखी मदत होते. दागिन्यांमध्ये कोणता ट्रेण्ड सध्या सुरू आहे,  याबाबतीत मी सजग असते असं अपूर्वाने सांगितलं.

अभिनयाबरोबर खाद्यसंस्कृती आणि फॅशनबाबतीतली आपली आवड जोपासणारी अभिनेत्री आरती वडगबाळकरचा ‘कलरछाप’ नावाचा फॅशनब्रँड आहे. ती म्हणाली, मी इन्स्टाग्रामवर विविध सणावारांनुसार माझी साडी नेसलेली छायाचित्रं सतत पोस्ट करायचे. ते मित्रमंडळींना आवडायचे. त्या वेळी मी साडीवर केलेल्या प्रयोगांना लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रियाही यायला लागल्या. लोकांना मी नक्की साडीवर काय प्रयोग करते आहे याबद्दल कुतूहल निर्माण झाले. त्यातूनच मी विचार केला की आपण साडय़ांनाच घेऊ न काहीतरी सुरू करावं आणि जेव्हा पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा बारा साडय़ा माझ्या पद्धतीने मी डिझाइन केल्या. त्यामागचा विचार असा होता की या साडय़ा बाजारामध्ये कु ठे मिळणार नाहीत, अशा प्रकारच्या असतील. यात पुढे पुढे प्रगती होत गेली व बारा साडय़ांचा आकडा बावीसवर गेला. जे माझं पहिलं कलेक्शन ठरलं आणि सर्वाना खूप आवडलं, असं तिने सांगितलं. आपल्या कलरछाप ब्रँडशी खूप चांगली, ओळखीतली माणसं जोडली गेली. एका फोनवर सगळे सहकार्य करण्यासाठी हजर झाले, असं आरती सांगते. ‘कलरछाप’ या ब्रॅण्डसाठी डिझाइन करताना अमुकच डिझाइन केलं पाहिजे असा मी हट्ट धरत नाही. मला कोणतेही कापड आवडले की मी ते विकत घेते. त्यावर मला हवं तसं डिझाइन करून पाहते. माझी स्वत:ची निवड रंगांच्या बाबतीतली ब्राइट आणि हॅप्पी अशी आहे. त्यामुळे मी कपडेही तसेच घेते आणि मला डिझाइन्सही तसेच सुचतात, असं ती म्हणते.

एखाद्या मालिकेसाठी आपण अभिनेता म्हणून ऑडिशन द्यायला गेलो आणि तुम्हाला त्याच मालिकेसाठी अभिनय नव्हे तर डिझाइन करशील का, अशी विचारणा झाली तर.. अभिनेता अथर्व चव्हाणच्या बाबतीत नेमकं असंच घडलं. अथर्व मराठी कलाकारांसाठी आणि मालिकांसाठी स्वतंत्रपणे डिझाइन करतो. ‘प्रतिपदा क्लोदिंग’ हा त्याचा फॅ शन ब्रँड आहे. त्याने ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेसाठी डिझाइन केलं. त्यानंतर त्याने ‘झी युवा’वरील काही मालिकांसाठी डिझाइन केलं. डिझाइन करताना तो स्वतही अपडेट असतो, त्यामुळे तो कुणाला भेटला तर हमखास त्याला विचारलं जातं, तू लुक डिझाइन करतोस का? त्याने स्वत: केलेल्या डिझाइनच्या पोस्ट समाजमाध्यमांवर टाकल्या. त्यानंतर फक्त कलाकारांसाठी लुक डिझाइन न करता सर्वासाठीच करू असा विचार अथर्वने केला. आता तो ‘विठुमाऊली’ मालिकेत काम करतो आहे, त्याचबरोबर त्याचं दुसऱ्या बाजूला काम सुरू असतं. मालिकांमध्ये काम करताना लुक डिझाइनचे काम सांभाळणे कधी कधी खूप कठीण जाते. पण तो दोन्ही गोष्टी व्यवस्थित सांभाळतो. मालिकांचे चित्रीकरण नसते तेव्हा विविध ठिकाणी फेरफटका मारतो, अगदी गल्लीतल्या बाजारातही जातो. त्यामुळे त्याला सध्या कुठले रंग, कुठले कपडे जास्त खरेदी केले जात आहेत, याचा अंदाज येतो. मुंबईव्यतिरिक्त अन्य ठिकाणीही फेरफटका मारून त्यांच्याकडे सध्या कुठल्या प्रकारची फॅ शन वापरात आहे, त्याची नोंद तो ठेवतो. त्यामुळे जेव्हा त्याला डिझाइनचं नवं काम मिळतं, त्यात त्याचा वापर करायला सोपं जातं. सध्या साडय़ांमध्ये भरपूर वेगळेपणा आला असून यामध्ये विविध प्रयोग करून केलेलं सादरीकरण लोकांना आवडतं आहे. त्यामुळे साडय़ांचे वेगवेगळे प्रकार चर्चेत आहेत, अशी माहितीही त्याने दिली.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे यांचा ‘तेजाज्ञा’ ब्रँड मराठी कलाकारांमध्ये लोकप्रिय होतो आहे. त्याच दरम्यान इतर कलाकारांनीही फॅ शनक्षेत्रात कंबर कसली आहे. अभिनेत्री सायली सुनील हिचा ‘जिजा ज्वेल्स’ नावाचा दागिन्यांचा ब्रँड आहे. अभिनेत्री श्रृजा प्रभुदेसाई सामाजिक संस्थांच्या मदतीने वेगळ्या पद्धतीने फॅ शनमध्ये आपलं नाव कमावते आहे. अभिनेत्री हर्षदा खानविलकरसुद्धा तिच्या जवळच्या काहींना सोबत घेऊन फॅ शनमध्ये वेगळा हात अजमावून पाहते आहे. कलाकारांशी झालेल्या या चर्चेमध्ये कलाकारांनी अभिनयाबरोबरच त्यांच्या फॅ शनब्रँडकडेही तितकेच लक्ष देणार असल्याचं सांगितलं. त्यांचे ब्रँड त्यांना सर्व लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. अलीकडे अनेकजण आपापले फॅ शनब्रँड काढताना दिसतात, परंतु आम्ही काहीतरी वेगळे करतोय ही वेगळी ओळख त्यांना जपायची असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अभिनेत्री शिल्पा तुळसकर म्हणाल्या, ‘‘कला क्षेत्रातील माझ्या खूप मैत्रिणी आहेत, ज्यांनी छंद म्हणून फॅशन ब्रँड्सची वाट निवडली आहे आणि याकडेही त्या व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहात आहेत. हा व्यवसाय त्यांनी चांगल्या पद्धतीने उभा केला आहे. आधीच तयार असलेल्या वस्तू त्या विकत नाहीत, तर त्या स्वत: बनवून त्याचा व्यवसाय करत आहेत. रेडिमेड कापड खरेदी करून त्याचा व्यवसाय न करता वेगळी निर्मिती करत आहेत. एक आवर्जून सांगावेसे वाटते की निवेदिताताई आपल्या व्यग्र जीवनशैलीतही हंसगामिनी या फॅशन ब्रँड्सच्या माध्यमातून साडय़ा डिझाइन करते. ती कलाक्षेत्रातील तिच्या जबाबदाऱ्या, घरच्या आणि व्यवसायाच्या जबाबदाऱ्या छान पद्धतीने पार पाडते आहे.

एकूणच कलाक्षेत्रात वावरताना कलकारांना अभिनयाबरोबर गाण्याचं, एखादं वाद्य वाजण्याचं वेड असतं. कुणाला वेशभूषेत रस असतो. असुरक्षित असलेली अभिनयकला जोपासताना एखादी अधिकची कला जोपासत त्याला व्यवसायाची जोड देण्याचं सामथ्र्य त्यांना मनापासून असलेल्या आवडीतून मिळालं आहे.

First Published on June 15, 2019 11:36 pm

Web Title: web series
Just Now!
X