नेटफ्लिक्सवरील बहुचर्चित अशा ‘सेक्रेड गेम’ या वेब सीरिजचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी टीझरद्वारे या वेब सीरिजमधील कलाकरांची ओळख करून दिली होती. त्यानंतर आता या सीरिजचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे

पोस्टरमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा एकदा गणेश गायतोंडे ही व्यक्तीरेखा साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. नेटफ्लिक्सने नवाजुद्दीनच्या फोटो पोस्ट करताना ‘पिछली बार क्या बोला था गणेश भाई को ? औकात!’, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. पहिल्या भागांप्रमाणे दुसऱ्या भागातही भन्नाट संवाद असतील असे चाहत्यांच्या अपेक्षा आहेत. सैफ अली खानदेखील पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागातही सरताज सिंग ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. दुसऱ्या भागांमध्ये अभिनेत्री कल्की कोचलीन, अभिनेता रणवीर शौरी हे दोन नवीन कलाकार दिसणार आहेत. कल्की बात्यो अबल्मन (Batya Abelman ) ही व्यक्तीरेखा साकराणार आहे. तर रणवीर शाहीद खान ही भूमिका वठविणार आहे.

 

View this post on Instagram

 

Pichli baar kya bola tha Ganesh bhai ko? Aukaat!

A post shared by Netflix India (@netflix_in) on

दरम्यान, कथानक, तगडे कलाकार, अभिनय, संवाद आणि सिनेमॅटीक लिबर्टीच्या बळावर पहिल्या भागाने प्रेक्षकांच्या मनावर ‘सेक्रेड गेम्स’ राज्य केलं. पहिल्या भागामधील सैफ अली खान (सरताज सिंग), नवाजुद्दीन सिद्दीकी (गणेश गायतोंडे), जतीन सारना (बंटी), पंकज त्रिपाठी (गणेश गायतोंडेचा तिसरा अध्यात्मिक गुरु) हे कलाकार पुढच्या भागातही दिसणार आहेत. मात्र, पहिल्या पर्वामध्ये जितेंद्र जोशी (काटेकर), राधिका आपटे (अंजली माथुर), कुब्रा सेट (कूकू) या कलाकारांची उणीव दुसऱ्या भागांत कोण भरून काढणार याची उत्सुकता प्रेक्षकांनी लागली आहे. कल्की कोचलीन आणि रणवीर शौरी शिवाय आणखी कोणकोणते नवीन कलाकार दुसऱ्या भागात असणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.