News Flash

बाप्पाच्या आशीर्वादाने `वेलकम जिंदगी’ चा मुहूर्त

एका पाठोपाठ धमाकेदार सिनेमांनंतर लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

| September 6, 2014 12:56 pm

एका पाठोपाठ धमाकेदार सिनेमांनंतर लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. `वेलकम जिंदगी’ या सिनेमातून स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री अमृता खानविलकर पहिल्यांदाच एकत्र येताहेत. अजित साटम प्रस्तुत या सिनेमाचा मुहूर्त १ सप्टेबर रोजी मुंबईतील गणेश गल्ली येथे बाप्पाच्या शुभाशीर्वादाने करण्यात आला. यावेळी सिनेमातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते. `वेलकम जिंदगी’ या सिनेमाची निर्मिती अजित साटम, संजय अहलुवालिया, बिभास छाया यांनी केली असून या सिनेमाचे दिग्दर्शन ऊमेश घाडगे यांनी केले आहे. मराठी रसिकांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्यासोबत रुपेरी पडद्यावर दिसणार असून त्यांची ही धमाल जोडी रसिकांचे धमाकेदार मनोरंजन करण्यासाठी येताहेत. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 12:56 pm

Web Title: welcome zindagi muhurt
Next Stories
1 आदित्यला अजून प्रेम गवसलेच नाही!
2 सलमानला दिलासा नाही
3 गणपती विशेषः देवाचं आदरातिथ्य
Just Now!
X