बॉलुवूडचा भाईजान सलमान खान देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. रफ अँड टफ अॅटिट्युडसाठी ओळखल्या जाणाऱ्या सलमानची त्याच्या फिटनेसमुळे तरुणांमध्ये क्रेझ आहे. सलमान आता ५४ वर्षांचा आहे. मात्र या वयातही तो इतका फिट कसा काय राहतो? असा प्रश्न अभिनेत्री दिशा पटानीला पडला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी देखील आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिच्या फिट अँड फाईन शरीरयष्टी मागे दररोज केला जाणार व्यायाम आहे. परंतु तिला सलमान खानचं मात्र अप्रुप वाटत. वयाच्या ५४व्या वर्षीही सलमान कसा काय इतका फिट राहतो? असा प्रश्न तिने टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत विचारला. मात्र या प्रश्नावर इतर कोणी उत्तर देण्याआधी तिनेच उत्तर दिले.

काय म्हणाली दिशा पटानी?

“सलमान दररोज व्यायाम करतो. तो डॉक्टरांनी सांगितलेले डाएट फॉलो करतो. वेळ मिळेल तेव्हा सायकल चालवतो. ध्यानधारणा करतो. विशेष म्हणजे तो आनंदी जीवन जगतो. त्यामुळे वयाच्या ५४व्या वर्षीही सलमान इतका फिट आहे. मी सलमानची खूप मोठी फॅन आहे. त्यामुळे मी फिटनेसची देखील फॅन आहे.” अशा शब्दात तिने सलमानच्या फिटनेसचे रहस्य सांगितले. दरम्यान या मुलाखतीत दिशाने सलमान खानच्या चाहत्यांना दररोज व्यायाम करण्याचा सल्ला देखील दिला.