बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ यांच्या लग्नाबद्दल हिंट दिली होती. त्यानंतर आता श्रद्धा कपूर विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. श्रद्धा कपूरचे पिता शक्ती कपूर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“काय बातम्या येत आहेत ? किंवा इंटरनेटवर काय चर्चा सुरु आहे? त्या बद्दल मला माहित नाही. पण मी माझ्या मुलीच्या मागे उभा राहणार. रोहन श्रेष्ठच का? उद्या श्रद्धाने तिच्या पसंतीने कोणाला निवडले, व त्याच्यासोबत मला आयुष्य घालवायचे आहे, असे सांगितले, तर माझा काहीही आक्षेप नसेल.” असे शक्ती कपूर म्हणाले.

रोहन बद्दल बोलताना शक्ती कपूर म्हणाले की, “रोहन खूप चांगला मुलगा आहे. रोहन घरी येतो, पण तो लहानपणापासून घरी येतोय. श्रद्धा त्याच्या बरोबर लग्नाचा विचार करतेय, हे तिने मला सांगितलेले नाही. माझ्यासाठी ते दोघेही बालपणीचे मित्र-मैत्रीणच आहेत. परस्पराबद्दल ते गंभीर आहेत का? या बद्दल मला माहित नाही.”

“श्रेष्ठ आणि कपूर हे कौटुंबिक मित्र आहेत. रोहनचे वडिल राकेश श्रेष्ठ यांना मी, ते फोटोग्राफर बनण्याआधीपासून ओळखतोय. मी राकेशसोबत फोटोशूटच केलेले नाही. तर आम्ही अनेकदा एकत्र जेवायला सुद्धा गेलो आहोत. तो माझा चांगला मित्र आहे” असे शक्ती कपूर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What shakti kapoor said about daughter shraddha kapoors wedding with rohan shrestha dmp
First published on: 28-01-2021 at 17:38 IST