क्रिकेट विश्वातील देव अशी ख्याती असणारा सचिन तेंडुलकरचे भारतासह जगभरात अनेक निस्सीम चाहते आहेत. मात्र, खुद्द सचिनची कन्या सारा तेंडुलकर सचिनपेक्षा अन्य कोणाची चाहती आहे, यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. सारा तेंडुलकर ही जगप्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बीबर याची मोठी चाहती असून नुकतेच त्याच्याबरोबरचे साराचे एक छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. काही दिवसांपूर्वी एका मासिकात प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रात सारा तेंडुलकर जस्टिन बीबरसोबत दिसत आहे. या छायाचित्रातील साराच्या चेहऱ्यावरील हावभाव बघता साराला जस्टिनच्या भेटीने खूपच आनंद झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हे छायाचित्र व्हायरल झाले असून अनेक ठिकाणी या छायाचित्राबद्दलची चर्चा सुरू आहे.
‘जस्टिन बीबर’ची अवघ्या १९व्या वर्षी गायनातून निवृत्ती!
काही दिवसांपूर्वीच १८ वर्षीय सारा तेंडुलकर शाहिद कपूरसोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा होती. मात्र, आपली मुलगी सध्या तिच्या शैक्षणिक जीवनाचा आनंद घेत असून, ती चित्रपटात काम करणार असल्याच्या अफवांनी त्रस्त झाली असल्याचे सांगत सचिनने या चर्चेला पुर्णविराम दिला होता.
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2015 रोजी प्रकाशित
सारा तेंडुलकर आणि जस्टिन बीबरचे छायाचित्र व्हायरल
काही दिवसांपूर्वीच १८ वर्षीय सारा तेंडुलकर शाहिद कपूरसोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा होती
Written by रोहित धामणस्कर
Updated:

First published on: 16-12-2015 at 01:31 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What was sara tendulkar doing with justin bieber