02 March 2021

News Flash

Mumbai Pune Mumbai 3 Teaser : लव्हस्टोरी तीन वर्षांची झाली!

सुखी संसाराची तीन वर्षे पूर्ण केलेल्या गौरी आणि गौतम या दोघांच्या आयुष्यात लवकरच गोंडस पाहुणा येणार आहे.

मुंबई- पुणे- मुंबई ३

मुंबई- पुणे वाद हा मुंबईकर आणि पुणेकरांनाही काही नवा नाही. पण एकमेकांशी वाद घालणारे हे मुंबई -पुणेकर एकमेकांच्या प्रेमात पडले तर..? गौरी-गौतमची अशीच काहीशी हटके लव्हस्टोरी सांगणारा ‘मुंबई-पुणे -मुंबई’ हा चित्रपट आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मुंबई-पुणे -मुंबई’चा तिसरा भाग म्हणजेच ‘मुंबई- पुणे- मुंबई ३’ येत्या काही महिन्यांत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटाचा पहिला वहिला टिझर नुकताच प्रदर्शित झाला. गौरी आणि गौतमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा या चित्रपटाच्या निमित्तानं उलगडणार आहे. सुखी संसाराची तीन वर्षे पूर्ण केलेल्या गौरी आणि गौतम या दोघांच्या आयुष्यात लवकरच गोंडस पाहुणा येणार आहे. टिझरमधून या गोड बातमीचा धम्माल किस्सा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सतिश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई- पुणे- मुंबई’ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आलेल्या चित्रपटाच्या सिक्वललाही महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा, गुजरात, कर्नाटक आणि अगदी अमेरिका, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमधील चित्रपट रसिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यामुळे एकंदरच गौतम आणि गौरीवरचा प्रेक्षकांचं प्रेम पाहता या प्रेमकथेचा आणखी एक पदर ‘मुंबई- पुणे- मुंबई ३’ मध्ये उलगडणार आहे. हा चित्रपट संपूर्ण राज्यात ७ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 6:27 pm

Web Title: whatch swapnil joshi mukta barve mumbai pune mumbai 3 teaser
Next Stories
1 दुष्काळाचे वास्तव दर्शन घडवणारा ‘एक होतं पाणी’
2 India’s Best Dramebaaz finale : कॅन्सरग्रस्त सोनालीचा चिमुकल्या स्पर्धकांसाठी भावनिक संदेश
3 ‘नाना असं कधीच वागणार नाहीत’ – पहलाज निहलानी
Just Now!
X