20 November 2017

News Flash

…म्हणून बोनी कपूरने अर्जुनला विचारलं तू ‘गे’ आहेस का?

'हा किस्सा आठवला की आजही मला खूप हसू येतं'

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: July 17, 2017 5:38 PM

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर

रिअल लाइफ काका-पुतण्याची जोडी म्हणजेच अर्जुन कपूर आणि अनिल कपूर यांचा आगामी ‘मुबारका’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दोघे मिळून चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. प्रमोशनाच्याच एका कार्यक्रमात अर्जुनने एक किस्सा सांगितला जे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले.

या मुलाखतीत अर्जुन म्हणाला की, ‘जेव्हा मी २० वर्षांचा होतो तेव्हा माझी स्वत:ची गाडी माझ्याजवळ नव्हती. त्यामुळे बाबांकडे मी नेहमी त्यांची गा़डी मागायचो. बाबांकडे त्यावेळी मर्सिडीज होती. तीन-चार वेळा त्यांच्याकडे मी गाडीची चावी मागितल्यानंतर संशय आल्याने त्यांनी मला एक प्रश्न विचारला. तुझी गर्लफ्रेंड आहे का, असा त्यांनी मला सवाल केला.’

बोनी कपूरच्या या प्रश्नाचे उत्तर अर्जुनने नकारार्थी दिले. आपल्या मित्रांसोबत नाइट क्लबला जात असल्याचे अर्जुनने बाबांना सांगितले. याबाबत अर्जुन पुढे म्हणाला की, ‘माझ्या उत्तरानंतर बाबांनी जो प्रश्न मला विचारला ते ऐकून मीच आश्चर्यचकित झालो. त्यांनी मला पुढे विचारलं की तू गे तर नाही ना? हा किस्सा आजही आठवला तरी मला पोट धरून हसायला येते.’

वाचा : जेवणापेक्षा सेक्सच निवडेन, नागार्जुनच्या सुनेचे बोल्ड वक्तव्य

दरम्यान, याआधीच्या एका मुलाखतीत अर्जुनने त्याच्या व्यग्र वेळापत्रकामुळे अजूनही ‘सिंगल’च असल्याचा खुलासा माध्यमांसमोर केला होता. त्याचप्रमाणे करिअर घडवण्यासाठी वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवल्याचे अर्जुनने म्हटले होते. अर्जुन कपूरचा आगामी चित्रपट ‘मुबारका’ २८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटात तो दुहेरी भूमिका साकारणार आहे.

First Published on July 17, 2017 5:38 pm

Web Title: when boney kapoor asked his son arjun kapoor if he was gay