25 April 2019

News Flash

..अन् हुमा कुरेशी अचानक ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ शो सोडून गेली

अभिनेत्री सोनाली बेंद्रेला हायग्रेड कॅन्सरचं निदान झाल्यामुळे तिला अचानक हा शो सोडावा लागला.

हुमा कुरेशी

‘गॅंग ऑफ वासेपूर’ फेम गर्ल हुमा कुरेशी कायमच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडणारी हुमा सध्या छोट्या पडद्यावरील ‘इंडिया बेस्ट ड्रामेबाज’ या रिअॅलिटी शोचं परिक्षकपद भूषवत आहे. मात्र या शोच्या सेटवर एका कारणामुळे हुमा शोच्या सेटवरुन निघून गेल्याचं पाहायला मिळालं.

अभिनेत्री सोनाली बेंद्रेला हायग्रेड कॅन्सरचं निदान झाल्यामुळे तिला अचानक हा शो सोडावा लागला. त्यामुळे तिच्या जागी परिक्षक म्हणून हुमाची निवड करण्यात आली. मात्र शोचं चित्रीकरण सुरु असताना अभिनेता आणि डान्सर असलेल्या शंतनू महेश्वरीने हुमाची थट्टा केल्यामुळे हुमाने सेटवरुन जाणे पसंत केलं.

‘एक थी डायन या चित्रपटामध्ये हुमा कुरेशी झळकली होती. या चित्रपटामध्ये हुमाने केलेल्या अभिनयाचं कौतुक करत शंतनूने तिचं थट्टा केल्याचं पाहायला मिळालं. मी केवळ तुमच्यामुळे एक थी डायन हा चित्रपट ५० वेळा पाहिला. तुम्ही केलेला अभिनय अप्रतिम असून तुम्ही केवळ सुंदरच नाही तर खरंच एखाद्या डायन सारख्या दिसत होतात’, असं शंतनू म्हणाला. शंतनूचं हे वाक्य ऐकताच हुमा सेट सोडून गेली. विशेष म्हणजे सेट सोडून जाणं हा एक मजेचा भाग होता. हुमा नाराज होऊन किंवा चिडून गेली नव्हती. मात्र शंतनूला हे सारं खरंच घडत असल्याचं वाटलं.

Observing and Absorbing my surroundings

A post shared by Shantanu Maheshwari (@shantanu.maheshwari) on

पुढे तो असंही म्हणाला, ‘हुमा सेट सोडून गेल्या याच मला खरंच आश्चर्य वाटतं. मी निर्मळ मनाने फक्त एक विनोद केला होता. यामुळे हुमा नाराज होतील असं वाटलं नव्हतं. मी विनोद करताच त्या अचानक सेटवरुन निघून गेल्या. मला वाटतंय माझंच काही तरी चुकलं असावं’. दरम्यान, या प्रकारानंतर सेट सोडून गेलेल्या हुमाला उमंग कुमार परत सेटवर घेऊन आले. त्यानंतर अभिनेता विवेक ओबरॉय आणि हुमाने शंतनूची मस्करी केल्याचं समोर आलं. मात्र या साऱ्या प्रकारामुळे शंतनूची भितीने चांगलीच गाळणं उडाल्याचं पाहायला मिळालं.

 

First Published on August 10, 2018 4:08 pm

Web Title: when huma qureshi walked out of indias best dramebaaz