News Flash

VIDEO: लेकीसोबत श्रीदेवी यांची अखेरची बाईक राइड

'धडक' चित्रपटासाठी जान्हवी करत होती सराव

श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाल्याचे अनेकांनाच ठाऊक आहे. लेकीच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाची उत्सुकता श्रीदेवी यांनीही होती. म्हणूनच त्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून तिच्या पहिल्या चित्रपटाचा पोस्टर ‘पिन’ करून ठेवला होता. गेल्या काही दिवसांपासून जान्हवी तिच्या भूमिकेसाठी मेहनत घेत होती आणि यासाठीच ती बाईक चालवण्यास शिकत होती. तिच्या या सरावात श्रीदेवीसुद्धा साथ देत होत्या. लेकीसोबतच्या बाईक राइडचा अखेरचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत जान्हवी बाईक चालवण्यास शिकत आहे आणि श्रीदेवी तिच्यामागे तिला आत्मविश्वास देण्यासाठी बसल्याचे पाहायला मिळत आहे. जान्हवी आपली आई श्रीदेवीला तिच्या ओशिवरा इमारतीच्या आवारात बाईकवर राइड मारायला न्यायची.

दुबईमध्ये अचानकपणे श्रीदेवीचा मृत्यू झाल्याने बोनी कपूर, श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी आणि जान्हवीसाठी हा धक्का पचवणे अजूनही कठिणच आहे. ‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार, जान्हवीच्या पदार्पणाच्या ‘धडक’ या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत श्रीदेवी यांचा विशेष उल्लेख करण्यात येणार आहे. याशिवाय सिमरन चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपणही आपल्या आगामी चित्रपटासाठी श्रीदेवी यांच्याशी बोलायला जाण्याच्या तयारीत होतो, मात्र त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण भविष्यात हा चित्रपट झालाच तर तो श्रीदेवीला समर्पित करण्यात येईल असेही मेहता यांनी सांगितले.

श्रीदेवी आपल्या पुतण्याच्या लग्नासाठी दुबई येथे गेल्या असताना बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या कायदेशीर पद्धतींमुळे त्यांचे पार्थिव भारतात येण्यासाठी तब्बल तीन दिवस लागले. मंगळवारी रात्री त्यांचे पार्थिव भारतात आले. आज सकाळपासून बॉलिवूडमधील दिग्गज आणि चाहत्यांनी श्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी अक्षरशः तिच्या घराबाहेर रांग लावल्याचे चित्र आहे. देशाने एका अतिशय प्रतिभावान अभिनेत्रीला गमावले आहे. त्यामुळे मागील ३ दिवसांपासून चित्रपटसृष्टीबरोबरच सर्वच क्षेत्रात दुखा:चे वातावरण पहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 12:47 pm

Web Title: when janhvi kapoor took sridevi on a ride for upcoming dhadak movie
Next Stories
1 Sridevi demise: प्रश्न विचारणं हे माध्यमांचं कामच- अन्नू कपूर
2 त्या नावाप्रमाणेच ‘देवी’ होत्या- जतिन वाल्मिकी
3 ग्लॅमगप्पा : आर माधवन घायाळ
Just Now!
X