अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांना बॉलिवूडमधील आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जातं. त्यांचे फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. मात्र यावेळी हे जोडपं अभिनेत्री जया बच्चन यांच्यामुळे चर्चेत आहे. त्यांचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये त्या ऐश्वर्याची तोंड भरुन स्तुती करताना दिसत आहेत. जया बच्चन यांनी केलेलं कौतुक ऐकून ऐश्वर्याचे डोळे पाणावले.
२००७ मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नापूर्वी एका पुरस्कार सोहळ्यात जया बच्चन यांनी पुरस्कार स्वीकारताना ऐश्वर्याची स्तुती केली. “एक खूप चांगली आणि सुंदर मुलगी आहे, जी नितीमूल्यांचा विचार करते, आदराने वागते आणि खूप सुंदर हसते, अशा मुलीची मी सासू होणार आहे. माझ्या कुटुंबात तुझं स्वागत करते, आय लव्ह यू”, असं जया बच्चन म्हणाल्या. हे ऐकताना भावूक झालेल्या ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी तरळलं.
View this post on Instagram
आणखी वाचा : हेमांगी कवीचं मुंबईत ‘घरकुल’; ‘म्हाडा’मध्ये सलग आठ वर्षे प्रयत्न केल्यानंतर लागली लॉटरी
‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्येही त्यांनी ऐश्वर्याचं कौतुक केलं होतं. “ऐश्वर्या बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री आहे. मात्र तरीही बच्चन कुटुंबात असताना ती सर्वात मागे उभी राहते. उगाचंच पुढे पुढे करत नाही. सर्वांचा आदर करते. विशेष म्हणजे ती खूप शांत आणि हसऱ्या स्वभावाची आहे,” असं त्या म्हणाल्या होत्या.