27 January 2021

News Flash

Video : जेव्हा भर कार्यक्रमात मीराने केली करण जोहरची बोलती बंद

शोमध्ये नेहमी सेलिब्रिटींना प्रश्न विचारणाऱ्या करणला मीरानेच विचारला प्रश्न

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून निर्माता दिग्दर्शक करण जोहरला चांगलंच ट्रोल केलं जातंय. त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमधला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चॅट शोमध्ये सूत्रसंचालक करण आलेल्या सेलिब्रिटींना विविध प्रश्न विचारतो. मात्र एका एपिसोडदरम्यान अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने हिने करणला एक प्रश्न विचारून त्याची बोलतीच बंद केली.

शाहिद कपूर व मीरा राजपूतने ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत करण मीराला काही प्रश्न विचारण्यापूर्वी ती त्याला थांबवते आणि प्रश्न विचारते. “प्रतिभेला अनुसरून तू या अभिनेत्यांना एक ते पाच या क्रमांकावर ठेव. रणबीर कपूर, रणवीर सिंग, सिद्धार्थ मल्होत्रा, अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर,” असे पर्याय ती करणला देते. हे पर्याय ऐकून तिच्या बाजूला बसलेला शाहिद आश्चर्यचकित होतो आणि तिला विचारतो की यात माझं नाव का नाही?

शाहिदच्या प्रश्नाचं उत्तर देताना मीरा अप्रत्यक्षरित्या करण जोहरला टोला लगावते. “कारण तो कधीच त्याच्या कोणत्या यादीत तुझं नाव घेत नाही”, असं मीरा म्हणताच करण जोहरच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघण्यासारखे होतात.

करण जोहरमुळे बॉलिवूडमध्ये घराणेशाही फोफावली आहे, अशी टीका नेटकरी करत आहेत. अभिनेत्री कंगना रणौतनेही त्याच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे. या ट्रोलिंगमुळे करणचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स कमी झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 10:13 am

Web Title: when mira rajput stood up for shahid kapoor on koffee with karan left karan johar speechless ssv 92
Next Stories
1 ‘हंसना आसान है, हंसाना बहुत मुश्किल..’; जगदीप यांच्या आठवणीत सेलिब्रिटी भावूक
2 शोलेतला ‘सुरमाँ भोपाली’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचं निधन
3 तुफान व्हायरल होणारं ‘हे’ भोजपुरी गाणं तुम्ही पाहिलंय का?
Just Now!
X