News Flash

जेव्हा सलीम खान यांनी सांगितलं होतं सलमानच्या फसलेल्या रिलेशनशिप्समागील खरं कारण

कोणत्याही अभिनेत्रीशी सलमानचं नातं फार काळ का टिकू शकत नाही, यामागचं कारण सलीम खान यांनी सांगितलं होतं.

सलीम खान, सलमान खान

‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ अभिनेता सलमान खान लग्न कधी करतोय, हा प्रश्न बॉलिवूडमध्ये आतापर्यंत सर्वाधिक विचारला गेलेला प्रश्न असेल. सलमान कोणाशी लग्नगाठ बांधणार हासुद्धा तितकाच चर्चेचा विषय आहे. आजपर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत सलमानचं नाव जोडलं गेलं. ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, संगीता बिजलानी आणि इतरही काही…मात्र सलमान अद्यापही लग्नाच्या निर्णयापर्यंत येऊ शकला नाही.

सलमानच्या अफेअरच्या व ब्रेकअपच्या बातम्या चवीने चघळल्या जातात. मात्र त्याच्या या अपयशी नात्यांमागील कारण कोणालाच कळू शकलेलं नाही. त्याच्या या अपयशी रिलेशनशिप्समागील खरं कारण त्याचे वडील सलीम खान यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. फराह खानच्या ‘तेरे मेरे बीच मै’ या टॉक शोमध्ये त्यांनी २००९ मध्ये हजेरी लावली होती.

आणखी वाचा : दिवसाला फक्त ५० रुपये कमाई ते BMW चा मालक; TikTok स्टार फैजलचा थक्क करणारा प्रवास

या शोमध्ये सलीम खान म्हणाले होते, “एखाद्या अभिनेत्रीवर, एखाद्या स्टारवर प्रेम जडतो, कारण त्या व्यक्तीसोबत काम करताना जास्त वेळ एकत्र घालवला जातो. भेटीगाठी होत राहतात. मात्र त्यानंतर तो त्या व्यक्तीमध्ये स्वत:च्या आईला शोधू लागतो आणि ती त्याला सापडत नाही. त्यामुळे त्याच्या आयुष्यातील सर्व रिलेशनशिप याच कारणामुळे टिकत नाहीत.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 4:47 pm

Web Title: when salman khan father salim khan revealed the real reason behind his failed relations ssv 92
Next Stories
1 शिवा होऊ देईल का सोनी-सरकारचं लग्न?
2 ते २४ तास वेड लावणारे होते, करोनाग्रस्त अभिनेत्याने सांगितला अनुभव
3 …म्हणून ‘डीआयडी’फेम धर्मेशवर आली रस्त्यावर डान्स करुन पैसे कमवायची वेळ
Just Now!
X