25 February 2020

News Flash

‘…अन् माझं ते स्वप्न साकार झालं’, सुबोध भावेचं भावनिक ट्विट

'कलाकारांनी कसं असावं, कसं वागावं, कसं रहावं आणि कसं काम करावं याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहेत.'

सुबोध भावे

बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. ही संधी जर मातृभाषेच्या चित्रपटात मिळाली तर आनंद द्विगुणीत होतोच. अभिनेता सुबोध भावेसोबत असंच काहीसं घडलं आहे. आगामी मराठी चित्रपटात बिग बी आणि सुबोध भावे एकत्र काम करणार आहेत. त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत सुबोधने भावनिक पोस्ट लिहिली आहे.

‘निर्विवादपणे ते अभिनयाचे शहेनशहा आहेत. त्यांच्याबरोबर काम करावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. माझंही होतं आणि माझ्या मातृभाषेतील मिलिंद लेले दिग्दर्शित ‘AB आणि CD’ चित्रपटात ते साकार झालं. कलाकारांनी कसं असावं, कसं वागावं, कसं रहावं आणि कसं काम करावं याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. मला ही संधी दिल्याबद्दल माझ्या टीमचे मनपूर्वक आभार,’ अशी पोस्ट सुबोधने या फोटोसोबत लिहिली आहे.

View this post on Instagram

निर्विवाद पणे ते अभिनयाचे शहेनशहा आहेत.त्यांच्या बरोबर काम करावं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. माझंही होतं आणि माझ्या मातृभाषेतील,मिलिंद लेले दिग्दर्शित " AB आणि CD" चित्रपटात ते साकार झालं. कलाकारांनी कसं असावं कसं वागावं कसं रहावं आणि कसं काम करावं याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. मला ही संधी दिल्याबद्दल माझ्या टीम चे मनपूर्वक आभार. @planet.marathi #ABaaniCD

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

मिलिंद लेले दिग्दर्शित ‘AB आणि CD’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, सुबोध भावेसोबतच विक्रम गोखले, सायली संजीव आणि अक्षय टंकसाळे यांच्या भूमिका आहेत. अमिताभ बच्चन यामध्ये विक्रम गोखले यांच्या मित्राच्या भूमिकेत दिसतील. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

First Published on May 22, 2019 12:49 pm

Web Title: when subodh bhave meet amitabh bachchan watch this photo
Next Stories
1 सलमान प्रियांकासह काम करणार पण ‘या’ अटीवर
2 मुलाच्या ‘त्या’ अटीनंतर सुंदरतेची परिभाषा बदलली – ताहिरा कश्यप
3 बिग बींनी सांगितलं ‘सूर्यवंशम’ वारंवार दाखविण्यामागचं खरं कारण
Just Now!
X