21 September 2020

News Flash

श्रुती मोदी आहे तरी कोण? सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने तिच्या विरोधात दाखल केला गुन्हा

सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात श्रुती मोदीचंही नाव

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयने सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला. या सहा जणांपैकी एक श्रुती मोदी या नावाची फार चर्चा आहे. ही श्रुती मोदी आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतच्या घराचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि श्रुती मोदी ही सहा नावं आहेत. सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांकडे तक्रार दाखल करताना रियासोबतच श्रुतीचंही नाव घेतलं होतं. त्यांच्या तक्रारीच्या आधारेच बिहार पोलिसांनी एफआयआर दाखल केली होती. बाकीची नावं जरी याआधी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी समोर आली असली तरी श्रुती मोदी हे नवीन नाव आता समोर आलं आहे.

कोण आहे श्रुती मोदी?

रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांची मॅनेजर म्हणून श्रुती मोदीने काम केलं आहे. सुशांतच्या कंपनीत रिया-शोविकचं सर्व काम श्रुती पाहायची. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यू प्रकरणी श्रुतीचीही चौकशी केली होती.

श्रुतीने मुंबई पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती जुलै २०१९ ते फेब्रुवारी २०२० या काळात सुशांतसोबत काम केलं होतं. ‘झी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांत आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आणि दर महिन्याला जवळपास दहा लाख रुपये खर्च करायचा अशी माहिती श्रुतीने पोलिसांना दिली होती. यामध्ये वांद्रे इथल्या घराचं साडेचार लाख रुपये भाडं तो भरायचा. सुशांतच्या दर महिन्याच्या खर्चाचा हिशोबसुद्धा तिने पोलिसांना सोपवल्याचं कळतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 1:30 pm

Web Title: who is shruti modi accused in sushant singh rajput death case ssv 92
Next Stories
1 पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल शंकुतला देवींनी मृत्यूआधी केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी
2 सुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली…
3 सुशांत सिंह मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात दाखल, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी चौकशी
Just Now!
X