31 October 2020

News Flash

‘सेक्रेड गेम्स २’मध्ये राधिका आपटे का नाही?,तिनेच केला उलगडा

पहिल्या सिझनमध्ये राधिका आपटेने रॉ एजंटची भूमिका साकारली होती

राधिका आपटे

मोठ्या पडद्यावरील चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील विविध मालिका यांना सध्याच्या काळामध्ये वेब सीरिज चांगलीच टक्कर देत आहेत. त्यामुळे सध्या तरुणाईमध्ये वेब सीरिजची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच नेटफ्लिक्सवर विशेष गाजत असलेली सीरिज म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’. अल्पावधीत लोकप्रियता मिळविलेल्या या सीरिजमध्ये सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी आणि राधिका आपटे हे मुख्य भूमिकेत होते. या सीरिजने सोशल मीडियावर प्रेक्षकांची प्रचंड लोकप्रियता मिळविली. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी या सीरिजचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला. या दुसऱ्या सिझनमध्ये जुन्या चेहऱ्यांसोबतच काही नवीन चेहरेही प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र पहिल्या सिझनमधील असे अनेक कलाकार होते, ज्यांना पुन्हा एकदा नव्या सिझनमध्ये पाहण्याची प्रेक्षकांना इच्छा होती. यापैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री राधिका आपटे.

पहिल्या सिझनमध्ये रॉ एजंटची भूमिका साकारणारी राधिका आपटे ‘सेक्रेड गेम्स २’मध्ये नव्हती. पहिल्या सिझनमधील अनेक कलाकार दुसऱ्या सिझनमध्ये असताना केवळ राधिका आपटेच का नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. त्यावर आता राधिकाने उत्तर दिलं आहे. दुसऱ्या सिझनमध्ये तिची भूमिका का नव्हती याचा उलगडा तिने केला आहे.

काही दिवसापूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये राधिकाने ‘सेक्रेड गेम्स २’ विषयी अनेक गोष्टींवर चर्चा केली. त्यासोबतच तिने या दुसऱ्या सिझनचा भाग का नव्हती, याचा खुलासाही केला. ‘सेक्रेड गेम्स २ मध्ये तुझी भूमिका का नाही’?, असा प्रश्न राधिकाला विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना तिने त्यामागचं कारण सांगितलं.

”सेक्रेड गेम्स’च्या पहिल्या भागामध्ये मी रॉ एजंट अंजली माथुर हिची भूमिका साकारली होती. या पहिल्या भागामध्येच अंजली माथुरचा मृत्यू झाल्याचं दाखविण्यात आलं आहे. त्यामुळेच दुसऱ्या सिझनमध्ये माझी भूमिका नाहीये. परंतु अंजली माथुर साकारताना मला विशेष मज्जा आली”, असं राधिकाने सांगितलं.

दरम्यान, ‘सेक्रेड गेम्स’चा पहिला सिझन प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत उतरला होता. मात्र त्याच्या तुलनेत ‘सेक्रेड गेम्स २’ हा प्रेक्षकांना फारसा भावलेला दिसत नाही. या नव्या सिझनमध्ये कल्की कोचलीन, पंकज त्रिपाठी, सैफ अली खान हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 4:51 pm

Web Title: why radhika apte is not be part of web series sacred games 2 revealed ssj 93
Next Stories
1 ”लाजेखातर तरी प्रेक्षकांना सहभागी होऊ द्या”; ‘तिकीट टू फिनाले’ टास्कवर भडकला पराग
2 वयाच्या १७ व्या वर्षी ‘ही’ अभिनेत्री होती प्रेग्नंट
3 KBCच्या पहिल्या करोडपतीचं १९ वर्षांत असं बदललं आयुष्य; रातोरात बनला होता स्टार
Just Now!
X