News Flash

“म्हणून आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला..”, अभिषेकने सांगितले ऐश्वर्याशी लग्न करण्याचे कारण

जाणून घ्या सविस्तर

अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. उमराव जान या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी हे रिलेशनशिपमध्ये आले आणि २००७मध्ये या दोघांनी लग्न केले. ऐश्वर्या आणि अभिषेकशच्या लव्हस्टोरीची सुरूवात कशी झाली असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नेहमीच असतो. आता अभिषेकने एका मुलाखतीत त्यांच्या प्रेमाची सुरूवात कशी झाली याचा खुलासा केला आहे.

अनेकांना माहित नाही की अभिषेकने ऐश्वर्याला २००७मध्ये न्यु यॉर्क मधील एका हॉटेलच्या बालकनीमध्ये प्रपोज केले होते. साखरपुडा झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल सांगितले.

दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचा मुलगा असल्याने ऐश्वर्याने अभिषेकशी लग्न केले, असे अनेकांना वाटते. या बद्दल बोलताना २०१४ मध्ये अभिषेकने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये सांगितले. “मी अभिनेता आहे किंवा बिग बींचा मुलगा आहे म्हणून ऐश्वर्याने माझ्याशी लग्न केले नाही. त्याच प्रमाणे ती विश्व सुंदरी किंवा अभिनेत्री असल्यामुळे मी तिच्याशी लग्न केले नाही. आमच्यात असलेल्या केमिस्ट्रीमुळे आम्ही लग्न केले.”

पुढे त्यांच्या नात्याबद्दल बोलताना अभिषेक म्हणाला, “मला वाटते की ऐश्वर्या खूप सुंदर आहे आणि माझ्यासाठी ती पृथ्वीतलावरची सगळ्यात सुंदर स्त्री आहे. मी माझा चेहरा आरशात बघतो तेव्हा मी घाबरतो. मी तिच्याशी स्पर्धा करूच शकत नाही, आम्ही एकत्र राहण्याच कारण कॉस्मॅटिक्स नाही आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 7:21 pm

Web Title: why they got married abhishek told the reason dcp 98
Next Stories
1 अक्षय पाठोपाठ गोविंदा करोना पॉझिटिव्ह
2 बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3 नेहा धुपियाने शेअर केला दिल्ली विमानतळावरील फोटो; म्हणाली “आता तरी सुधरा”
Just Now!
X