२०२०-२१ या वर्षात आलेल्या अनेक वेब सिरीज, शॉर्टफिल्म्स आणि चित्रपटांपैकी काही चित्रपटांना, कलाकारांना क्रिटिक्स चॉईस पुरस्कार मिळाले. अभिनेता मनोज वाजपेयी, अभिनेत्री सुश्मिता सेन यांच्यासोबतच अनेक नवे जुने कलाकार समीक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. लघुपट, चित्रपट, वेबसीरिज अशा वेगवेगळ्या विभागांसाठी हे पुरस्कार देण्यात आले.

हंसल मेहता दिग्दर्शित स्कॅम 1992 द हर्षद मेहता स्टोरी ही वेबसिरीज सर्वोत्कृष्ट ठरली तर इब आले ऊ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. बेबाक सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला तर यासाठी शाझिया इक्बाल यांना लेखन आणि दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.

सविस्तरपणे पाहुयात कोण ठरले आहेत या पुरस्कारांचे मानकरीः
१. लघुपट विभाग
सर्वोत्कृष्ट लघुपट- बेबाक
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- शाझिया इक्बाल (बेबाक)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- आदिल हुसेन (मील)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- अमृता सुभाष (द बूथ)
सर्वोत्कृष्ट लेखन- शाझिया इक्बाल (बेबाक)

२. चित्रपट विभाग
सर्वोत्कृष्ट चित्रपट- इब आले ऊ
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- प्रतिक वत्स (इब आले ऊ)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- मनोज वाजपेयी (भोसले)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- तिलोत्तमा शोम (सर)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- पंकज त्रिपाठी (गुंजन सक्सेनाः द कारगिल गर्ल)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- साई पल्लवी (पावा कढईगल)
सर्वोत्कृष्ट लेखन- सचि (अय्यप्पनम कोशियम)
सर्वोत्कृष्ट छायांकन- सिद्धार्थ दिवान (बुलबुल)
सर्वोत्कृष्ट संपादन- महेश नारायणन (सी यू सून)
लिंग संवेदनशीलता पुरस्कार- थप्पड

३. वेब सिरीज विभाग
सर्वोत्कृष्ट वेब सिरीज- स्कॅम 1992 द हर्षद मेहता स्टोरी
सर्वोत्कृष्ट अभिनेता- प्रतिक गांधी (स्कॅम 1992 द हर्षद मेहता स्टोरी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- सुश्मिता सेन (आर्या)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- अभिषेक बॅनर्जी (पाताल लोक)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री-स्वस्तिका मुखर्जी (पाताल लोक)
सर्वोत्कृष्ट लेखन- सुमित पुरोहित, सौरव डे, वैभव विशाल, करन व्यास(स्कॅम 1992 द हर्षद मेहता स्टोरी)