News Flash

कोण आहे ओमची खऱ्या आयुष्यातील स्वीटू?; ‘अशी ‘आहे शाल्व किंजवडेकरची लव्ह स्टोरी

'ओळख..मैत्री.. प्रेम'

‘येऊ कशी कशी मी नांदायला’ या मालिकेतील ओम आणि स्वीटूची जोडी सध्या प्रेक्षकांचं मन जिंकतेय. या जोडीला अगदी कमी काळातच प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे .मालिकेमध्ये सध्या ओम आणि स्वीटूचं नातं बहरताना दिसतंय. मात्र ओम म्हणजेच अभिनेता शाल्व किंजवडेकर याच्या खऱ्या आयुष्यातील स्वीटू बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

शाल्वने काही दिवसांपूर्वी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटला एक फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. शाल्व सोबत असलेली ही मुलगी कोण असे अनेक प्रश्न चाहत्यांनी विचारले. खास करून अनेक तरुणींनी ही तुझी गर्लफ्रेंड आहे का ? तुझं लग्न झालं आहे का ?असे अनेक प्रश्न त्याला विचारले.

लोकसत्ताच्या डिजिटल अड्डावर शाल्वने त्याच्या पर्सनल लाईफ बद्दल खुलासा केलाय. लहानपणापासूनची मैत्री आणि त्यातून निर्माण झालेलं समजुतदारपणाचं नातं, जवळीक आणि सुसंगती असं काहीस घट्ट नात दोघांमध्ये असल्याचं त्याने सांगितलं आहे.

या शिवाय शाल्व आणि अन्विताने सेटवरील धमाल अनुभव शेअर केले आहेत. ” सेटवर कुरघोड्या करणं मजा मस्ती करणं सुरुच असंतं” असा शाल्व म्हणाला आहे. तर अन्विताने शाल्वसोबत काम करायला मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय.” ऑफस्क्रीन शाल्वसोबत चांगली मैत्री असल्याने खूप आनंद झाला.” असं अन्विता म्हणाली आहे.

दरम्यान शाल्व किंजवडेकर आणि अन्विता फलटणकर यांची मालिकेतील जोडी म्हणजेच ओम आणि स्वीटू सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 8:54 am

Web Title: yeu kashi tashi me nandayala fame om aka shalva kinjawadekar real life love story kpw 89
Next Stories
1 जनसामान्यांचा हिरो पुन्हा मदतीला धावून आला..सोनू सूदची गरजूंसाठी नवी मोहीम!
2 “बिचारे, बाहेर खेळण्याच्या दिवसात घरात बसून आहेत”, लहानग्या हिरोंसाठी जॅकलीनची खास पोस्ट
3 स्वप्निल जोशीचा महत्वाचा निर्णय; ” सोशल मीडियाचा वापर करोनाचं युद्ध जिंकण्यासाठी”
Just Now!
X