News Flash

झायरा वसीमशी गैरवर्तणूक करणाऱ्याला अटक

३९ वर्षीय विकास सचदेवाला अटक करण्यात आली

झायरा वसीमशी गैरवर्तणूक करणाऱ्याला अटक
अभिनेत्री झायरा वसिम

दिल्ली ते मुंबई विमान प्रवासादरम्यान ‘दंगल गर्ल’ झायरा वसीम हिच्याशी असभ्य वर्तन करणाऱ्या विकास सचदेवा या व्यक्तीला अटक केली असून, आज न्यायालयात त्याला हजर केले जाणार आहे. विकास अंधेरी पूर्व येथे राहणारा आहे. मी जाणूनबूजून काही केले नसून मी फार थकलो होतो आणि विमानात झोपत होतो असे स्पष्टीकरण दिले आहे.

शनिवारी रात्री विस्तारा एअरलाइन्सच्या विमानातून झायरा मुंबईकडे परतत असताना तिची छेड काढण्यात आली. झायराने यासंदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर ३९ वर्षीय विकास सचदेवाला अटक करण्यात आली.

विकास एक व्यावसायिक आहे. त्याने आपली बाजू मांडताना म्हटले की, मी दिल्लीला कामानिमित्त गेलो होतो. अनेक दिवसांपासून योग्य झोप न मिळाल्यामुळे मी फार थकलो होतो. केबिन क्रूकडे चादर मागून मी झोपलो. मी जेवलोही नाही. यासंदर्भात विस्तारा एअरलाइन्सकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनीही विकास पूर्णवेळ झोपला होता, असे सांगितले. विकास म्हणाला की, ज्यावेळी माझा पाय झायराला लागला मी लगेच तिची माफीही मागितली. विकासच्या मते, हे काही ठरवून केलेले नाही.

झायराने रविवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. १७ वर्षीय झायरा मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी होण्यास आली होती.

काय होते पूर्ण प्रकरणः
विमानात आपल्या जागेवर झायरा झोपलेली असताना अगदी तिच्या मागच्या सीटवर बसलेल्या विकास तिच्या सीटवर मानेजवळ आपला पाय टाकून झोपला होता. तसेच तो झायराला पायाने स्पर्श करण्याचा प्रयत्नही करीत होता. या प्रकारामुळे झायरा घाबरुन गेली होती. हा प्रकार घडत असताना झायराने विमानाच्या क्रू मेंबर्सना याबाबत माहिती दिली. मात्र, त्याचाही काहीही उपयोग झाला नाही. तिच्या मदतीला कोणीही धाऊन आले नाही, असा आरोपही तिने केला. या घटनेचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, विमानातील अंधूक प्रकाशामुळे तिला ते शक्य झाले नाही.

मुंबईत उतरल्यानंतर झायराने इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत आपल्यासोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. ‘एखाद्या महिलेशी असे वागणे चुकीचे असून यामुळे मी अस्वस्थ झाले आहे.’ अशा प्रकारे तुम्ही मुलींची काळजी घेता का? असा संतप्त सवाल तिने केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 9:24 am

Web Title: zaira wasim alleged molestation vistara airlines accused vikas sachdev statement
Next Stories
1 TOP 10 NEWS : लवकरच विवाहबंधनात अडकणाऱ्या मराठी अभिनेत्यापासून बाहुबलीपर्यंत
2 विवाहित पुरुषाशी कधीच लग्न करणार नव्हती श्रीदेवी, पण…
3 गरोदर असतानाही चित्रीकरण केले, स्मृती इराणींनी सांगितल्या मालिका विश्वातील अडचणी
Just Now!
X