झी मराठी वाहिनीने यंदा अठरा वर्षे पूर्ण केली. अठरा वर्षे म्हणजे एका अर्थाने नवतारुण्यात पदार्पण. यामुळेच यावर्षी ‘उत्सव नात्यांचा नवतारुण्याचा’ अशी संकल्पना घेऊन झी मराठी अवॉर्ड्सचा सोहळा अतिशय रंगतदार पद्धतीने पार पडला. ज्यामध्ये १० पुरस्कार पटकावत ‘लागिरं झालं जी’ ने बाजी मारली. त्यापाठोपाठ ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेनेही सात पुरस्कार मिळवत आपला ठसा उमटवला. प्रेक्षकांच्या मतांद्वारे निवडण्यात येणा-या या पुरस्कारांसाठी यंदा भरघोस मतदानही झाले.

Bigg Boss 11: ‘सलमानला अंडरवर्ल्ड आणि दहशतवाद्यांचे भय’

मालिकांमधील कलाकारांचे रंगतदार नृत्य सादरीकरण, ‘चला हवा येऊ द्या’च्या कलाकारांनी उडवून दिलेली धम्माल आणि जोडीला संजय मोने आणि अतुल परचुरेसारख्या अनुभवी कलाकारांनी आपल्या निवेदनातून केलेल्या तुफान फटकेबाजीने हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेला. सळसळता उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलेला हा सोहळा येत्या रविवारी, १५ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वा. प्रेक्षकांना पाहता येईल.

दिवाळीचा सण जवळ आला की प्रेक्षकांना उत्सुकता असते ती ‘झी मराठी अवॉर्डस’च्या रंगतदार आतिषबाजीची. या सोहळ्यात कोणती व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट ठरणार ? लोकप्रिय नायक, नायिकेच्या पुरस्काराची विजयी माळ कुणाच्या गळ्यात पडणार ? लोकप्रिय मालिकेचा मान कुणाला मिळणार? असे उत्सुकतापूर्ण प्रश्न सर्वांच्या मनात असतात. अशीच उत्सुकता यंदाही होती. यावर्षी ‘लागिरं झालं जी’ आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगणार असं चित्र सुरुवातीपासूनच निर्माण झालं होतं.

अमूलच्या ‘त्या’ जाहिरातीमुळे हृतिकला आले रडू!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचा प्रत्यय प्रत्यक्ष पुरस्कार सोहळ्यातदेखील आला. ज्यामध्ये ‘लागिरं झालं जी’ या मालिकेने सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत, सर्वोत्कृष्ट सहाय्यक स्त्री आणि पुरुष व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा , सर्वोत्कृष्ट बाल कलाकार, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट आजी, सर्वोत्कृष्ट वडील, सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट जोडी असे पुरस्कार पटकावत या सोहळ्यावर आपली ठसठशीत मोहोर उमटवली. तर सर्वोत्कृष्ट भावंडं, सर्वोत्कृष्ट सासरे, सर्वोत्कृष्ट आई, सर्वोत्कृष्ट सून, सर्वोत्कृष्ट कुटुंब आणि सर्वोत्कृष्ट नायक असे पुरस्कार मिळवत सोहळ्यावर ‘तुझ्यात जीव रंगला’ने आपली छाप सोडली. यंदाचा सर्वोत्कृष्ट मालिकेच्या पुरस्कारांसाठीही या दोन मालिकांमध्ये जोरदार चुरस रंगली. प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हा समसमान होता त्यामुळे या दोन्ही मालिकांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला.