News Flash

‘झी मराठी’वर नव्या मालिकांचा मार्च!

महाराष्ट्रातील लेखकांच्या नावीन्यपूर्ण कथा टीव्हीच्या पडद्यावर

महाराष्ट्रातील लेखकांच्या नावीन्यपूर्ण कथा टीव्हीच्या पडद्यावर

मुंबई : गेले वर्षभर करोनाचा हाहाकार, टाळेबंदीतील जगणे अनुभवत जुन्याच मालिका पाहात रमलेल्या प्रेक्षकांसाठी नवीन वर्षांत नव्या मालिका देण्याचा सपाटा अनेक हिंदी-मराठी वाहिन्यांकडून सुरू आहे. मात्र महाराष्ट्राच्या विविध भागांतील लेखक आणि त्यांच्या नवीन कथांचा आग्रह धरत ‘झी मराठी’ वाहिनी मार्च महिन्यात आणखी काही नवीन मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. मार्च महिन्यात दर सोमवारी एक नवीन मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यापैकी ‘पाहिले न मी तुला’ या नवीन मालिके ची घोषणा करण्यात आली असून ‘रात्रीस खेळ चाले’ फे म अण्णा नाईकही पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

‘मनोरंजनाचा विचार करताना हा पुढचा काळ ‘उत्सव नात्यांचा, नवीन कथांचा’ या घोषवाक्यासह आम्ही साजरा करत आहोत. राज्याच्या विविध भागातील लेखकांनी लिहिलेल्या कथा मालिकारूपात पाहायला मिळणार असून मार्चमध्ये दर रविवारी एक सोहळा आणि दर सोमवारी एक नवीन मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे,’ अशी माहिती ‘झी मराठी’ वाहिनीचे व्यवसायप्रमुख नीलेश मयेकर यांनी दिली. महाराष्ट्र आणि भारताबाहेरही मराठी माणसांचे विश्व आहे. त्याही कथांवर आधारित मालिका सुरू करण्यात येणार असल्याचे मयेकर यांनी स्पष्ट के ले.

गेल्यावर्षी ‘रात्रीस खेळ चाले’ मालिके चे दुसरे पर्व लोकांनी पाहिले. या दुसऱ्या पर्वालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि ‘अण्णा नाईक’ ही व्यक्ति रेखा प्रचंड लोकप्रिय ठरली. त्यामुळे नवीन वर्षांत अण्णा नाईक आणि त्यांचा खेळ पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मात्र मालिके चे हे तिसरे पर्व आहे की वेगळे  कथानक पाहायला मिळणार, याबाबत गुप्तता राखण्यात आली आहे.

याशिवाय, ‘पाहिले न मी तुला’ ही आणखी एक नवीन मालिका सुरू होणार असून यात अभिनेता शशांक के तकर महत्त्वाच्या भूमिके त दिसणार आहे. सध्या वाहिनीवर सुरू असलेल्या ‘माझा होशील ना’ या मालिके त सुयश पटवर्धनची भूमिका साकारणारा अभिनेता आशय कु लकर्णी आणि नवोदित अभिनेत्री तन्वी मुंडले हे दोघेही नव्या मालिके त मध्यवर्ती भूमिके त आहेत.

नवे लेखक, नव्या कथा

सध्या सगळीकडे वेगवेगळ्या वाहिन्यांवरील लोकप्रिय मालिकांच्या कथांपासून प्रेरणा घेऊन नवीन मालिकानिर्मिती के ली जाते. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हे के ले जात असले तरी यामुळे इथले जे लेखक-दिग्दर्शक आहेत, त्यांच्यावर दूरगामी परिणाम होणार आहेत. इथल्या लेखक-दिग्दर्शकांनी स्वत: विचार करून नवे काही लिहिणे, घडवणे आवश्यक आहे, नाहीतर सगळे नकलाकार निर्माण होतील. त्यामुळे ‘झी मराठी’ वाहिनीने इथल्या लेखकांच्या कथा मालिकांमधून प्रेक्षकांसमोर आणण्याचा आग्रह धरला आहे, अशी माहिती मयेकर यांनी दिली. राज्याच्या विविध भागातील नव्या दमाचे लेखक यामुळे वाहिनीशी जोडले गेले आहेत, असेही त्यांनी सांगितले. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिके चा लेखक तेजस घाडगेने पहिल्यांदाच इतकी मोठी मालिका के ली होती. आता ‘काय घडलं त्या रात्री’ ही मालिका तो लिहितो आहे. सातारचा विशाल कदम आणि स्वप्निल गांगुर्डे यांनी मिळून ‘देवमाणूस’ मालिके ची कथा लिहिली आहे, विशाल नव्या मालिके साठीही लेखन करतो आहे. तर ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिकालिहिणारे राजेंद्र घाग रत्नागिरीचे असून ते सिंचन विभागात कार्यरत आहेत. आपली नोकरी सांभाळून मासिकांत कथा लिहिणाऱ्या घाग यांनी साठाव्या वर्षी पहिल्यांदा मालिके साठी लेखन के ले असल्याची माहितीही मयेकर यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2021 12:18 am

Web Title: zee marathi will bring new series to the audience in the month of march zws 70
Next Stories
1 Video : नवोदित लेखकांना समीर चौगुलेंचा लाखमोलाचा सल्ला
2 करोना काळात दुरावलेली नाती जवळ आली- भारती आचरेकर
3 ‘शेतकरी आंदोलनावर तू आता गप्प का?’ पॉर्नस्टार मिया खलिफाचा प्रियांका चोप्राला सवाल
Just Now!
X