News Flash

Video : पुन्हा एकदा रोमॅण्टिक होणार ‘किंग खान’

या गाण्यात शाहरुख आणि अनुष्का शर्माची रोमॅण्टिक केमिस्ट्री दिसत आहे.

Video : पुन्हा एकदा रोमॅण्टिक होणार ‘किंग खान’

रोमान्सचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खानचा ‘झीरो’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.त्यातच आता या चित्रपटातलं पहिलंवहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे.

शाहरुख आणि अनुष्का शर्मा यांची रोमॅण्टिक केमिस्ट्री दाखविणारं ‘मेरे नाम तू’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यामध्ये रंगाची उधळण करत शाहरुख त्याचं प्रेम व्यक्त करताना दिसत आहे.

काही दिवसापूर्वी ‘झीरो’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरमध्ये या गाण्याची एक लहानशी झलकही दाखविण्यात आली होती. प्रथम हे गाणं २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार  होतं. मात्र २१ तारखेला चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आल्यामुळे हे गाणं २३ नोव्हेंबरला प्रदर्शित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, झीरो’ चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक आनंद एल. राय आणि शाहरुख पहिल्यांदाच सोबत काम करत आहेत. शाहरुख यात कमी उंचीची व्यक्तिरेखा असलेले ‘बउवा सिंग’चे पात्र साकारत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 1:48 pm

Web Title: zero first song mera naam tu shah rukhkhan and anushka sharma
Next Stories
1 ‘अन्य’च्या निमित्ताने प्रथमेश परबची बॉलिवूडमध्ये हॅट्रिक
2 …म्हणून शाहरुखसोबत काम करण्यास स्वराचा नकार
3 ‘ठंड तो नहीं लग रही?’; दीप-वीरच्या रिसेप्शनवर गमतीशीर मीम्स व्हायरल
Just Now!
X