अवघ्या १६ वर्षांच्या वयात सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्स हा किताब पटकाविला होता. १९९४ मध्ये तिला मिळालेल्या या यशामुळे सर्वत्रच आनंदाचे वातावरण होते. सुश्मिताने एक प्रकारे देशाचे नावंच उंचावल्याची भावना त्यावेळी सर्वांच्याच चेहऱ्यावर पाहायला मिळत होती. सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि सर्वांची मने जिंकण्याचे कसब अवगत असणाऱ्या सुश्मिताच्या चाहत्यांमध्ये आजही घट झालेली नाही. अशी ही चिरतरुण अभिनेत्री मिस युनिव्हर्सच्या त्याच स्तरावरुन पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ज्या किताबासाठी सुश्मिता स्पर्धक म्हणून उतरली होती त्याच किताबासाठी ती आता इतर सौंदर्यवतींचे परिक्षण करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुश्मिता सेन सध्या या सौंदर्य स्पर्धांच्या निमित्ताने मॅनिला येथे रवाना झाली आहे. या ठिकाणी ती ६५ व्या मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेसाठी परिक्षकाची भूमिका पार पाडणार आहे. परिक्षक होण्याचा हाच आनंद सुश्मिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन व्यक्त केला. ‘आनंदाने नाचणाऱ्या हृदयासोबत मी तयार होत आहे’, असे कॅप्शन लिहित सुश्मिताने #Philippines after #23years it’s where it all began #manila1994 #missuniverse1994 असे हॅशटॅग देत आनंद व्यक्त केला आहे. सुश्मिताचा हा प्रवास, तिचे सौंदर्य आणि आजही चाहत्यांना गारद करणारी तिची अदा म्हणजे क्या बात. तेव्हा आता सुश्मिता एक परिक्षक म्हणूनही तिची भूमिका चोखपणे बजावेल यात काही शंकाच नाही.

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मिस युनिव्हर्सचा किताब पटकाविल्यानंतर महेश भट्ट यांच्या ‘दस्तक’ या चित्रपटातून सुश्मिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सुश्मिताला कविता खूप आवडतात. ती स्वतःही कविता करते. सुश्मिताचा ‘बीवी नंबर वन’ हा चित्रपट फार गाजला होता. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कारही मिळाला होता. सुश्मिताने ‘आँखे’, ‘समय’, ‘मैं हूं ना’, ‘बेवफा’, ‘नो प्रॉब्लेम’, ‘मैने प्यार क्यू किया’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 23 years after wining miss universe sushmita sen ready to come back from the same platform as a judge
First published on: 22-01-2017 at 11:06 IST