भारतातील नामांकित चित्रपट महोत्सव म्हणून ओळख असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं यंदा गोव्यात आयोजन करण्यात आलं. १९५२ साली सुरू झालेला या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा ५० वं वर्ष असून यात वेगवेगळ्या देशांमधील २०० पेक्षा अधिक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

हा महोत्सव २० नोव्हेंबरपासून २८ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या महोत्सवात यावेळी विविध प्रादेशिक भाषांमधील २६ चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या ४९ व्या ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘इंडियन पॅनारोमा फीचर फिल्म’ विभागात २२ चित्रपटांपैकी केवळ २ आणि २१ नॉन फीचर फिल्मपैकी ८ मराठी लघुपटांची निवड करण्यात आली होती.