हिंदी असो वा मराठी सिनेसृष्टीत मैत्रीचे किस्से आपण नेहमीच ऐकले आहेत. मात्र ज्यांनी एकत्र सिनेमे बनवले, एकाच डब्ब्यात जेवणाचा आस्वाद घेतला, एकमेकांना सिनेनिर्मितीसाठी योग्यवेळी योग्य तो सल्ला दिला, अशा दोन धुरंधरांच्या मैत्रीविषयी आपल्याला तितकेसे माहित नाही आणि हे दोन धुरंधर आहेत… भगवान दादा आणि राज कपूर..
फायटर, डान्सर अशा अनेक उपाध्या मिळवून आपल्या ऍक्शनपटांमध्ये धन्यता मानलेल्या भगवान दादांना सोशल सिनेमाकडे वळण्याचा सल्ला दिला होता आपल्या इंडस्ट्रीचे शो मॅन राज कपूर यांनी. ऍक्शन पटांच्या दुनियेत रंगलेल्या भगवान दादांचे सिनेमे प्रेक्षकांना आवडायचेच शिवाय तांत्रिक बाबी समजणाऱ्या सिनेनिर्माते, दिग्दर्शकांना ही भगवान दादांच्या अनोख्या शैलीचे अप्रूप होते. या, ‘सिनेमाची दृष्टी’ असणाऱ्या लोकांमध्ये सामिल होते खुद्द ‘राज कपूर’. भगवान दादांची डान्सिंग स्टाइल, त्यांचे फाइट सिक्वेन्सेस राज कपूर यांना भुरळ घालायचे. हा सोशल सिनेमाचा मसाला भगवान दादाऍक्शन पटांमध्ये का वापरतात? हा प्रश्न पडलेल्या राज कपूर यांनी भगवान दादांना ऍक्शन पटांकडून सोशल सिनेमाकडे वळण्याचा सल्ला दिला. आपल्या मित्राचा हा प्रेमाचा सल्ला कसा टाळायचा, यासाठी त्या सल्ल्याचा विचार झाल्यानंतर भगवान दादांनी ‘अलबेला’ सिनेमा बनवण्याचे ठरवले आणि या अफलातून सिनेमाची कथा लिहिली गेली. प्यारेची भूमिका भगवान दादाचं साकारणार हे ठरले आणि या अलबेल्याच्या आशाचा शोध सुरू झाला. गीता बालीच्या रूपात ही आशा सिनेमात अवतरली आणि सिनेमा सुपरहिट ठरला. याच चित्रपटावर, चित्रपटाच्या निर्मितीकारावरावर आधारित “एक अलबेला” आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
अलबेला असो वा भगवान दादांचा इतर कोणताही सिनेमा या अवलियाचे आयुष्य खूप मनोरंजक होते. हाच मनोरंजन सोहळा आपण पुन्हा अनुभवणार आहोत एक अलबेला या चित्रपटाच्या निमित्ताने ज्याचे दिग्दर्शन केले आहे शेखर सरतांडेल यांनी.
मंगलमूर्ती फिल्मस् आणि किमया मोशन पिक्चर्स यांचा हा ‘एक अलबेला’ आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jun 2016 रोजी प्रकाशित
भगवान दादांच्या वाटचालीत राज कपूर ही सोबत..
काच डब्ब्यात जेवणाचा आस्वाद घेतला
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 24-06-2016 at 07:37 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A glimpse of raj kapoor in ekk albela