छोट्या पडद्यावरची अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘आई कुठे काय करते!’ या मालिकेने कमी वेळातच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.  ही मालिका सध्या मोठ्या वळणावर येऊन उभी आहे. एकीकडे अरूंधतीचे ऑपरेशन होऊन ती समृद्धी बंगल्यात परत येते तर दुसरीकडे अनिरुद्ध घर सोडून पळून गेला होता. आता या मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

‘आई कुठे काय करते!’ मालिकेत सध्या संजनानी लग्नाचा हट्ट पकडला आहे. त्यामुळे अनिरुद्ध पळून जातो मात्र अरूंधतीच्या सांगण्यावरून तो पुन्हा घरी येतो. तो घरी आल्यावर पळून जातो म्हणून संजना त्याला कानशीलात मारते. या मालिकेच्या येणाऱ्या भागात अनिरुद्ध संजनाला सांगतो की त्याला लग्न कऱा यचे नाही. त्याला कोणत्याही बंधनात अडकायचे नाही. मात्र संजना काही तिचा हट्ट सोडत नाही आणि पोलिसांना बोलवण्याची धमकी देते.

अनिरुद्धची आई अनिरुद्धला हात जोडून विनंती करते की आधीच आपल्या घरची कमी नाचक्की झाली नाही. आता कृपा करून घरी पोलिसांना बोलवण्याची वेळ आणू नको. घरातले सगळे सदस्य अनिरुद्धला समजवतात की आता वेळ निघून गेली आहे आणि तुम्ही पाठी फिरू शकत नाहीत. त्यामुळे मर्जी नसताना ही अनिरुद्धला संजनाशी लग्न करावं लागत. संजनाच लग्न होतं, तिचं स्वप्नं पूर्ण होतं आणि आता संजना समृद्धी बंगल्यात जाण्याचा हट्ट करताना दिसते. तिला आता समृद्धी बंगल्यात गृहप्रवेश करायचा आहे. एकीकडे अनिरुद्ध संजनाला समजावण्याचा प्रयत्न करतो, तिला सांगतो की आपण घरी जाऊ शकत नाही. तर दुसरीकडे अरुंधती कांचनला सांगते की संजना आल्यावर भांडणांना सुरवात नको  म्हणून मी आता थोडे दिवस ईशाला डोंबिवलीला घेऊन जाते.

‘आई कुठे काय करते!’च्या येणाऱ्या भागात अरुंधती घर सोडून जात असताना संजना आणि अनिरुद्ध पुन्हा घरी येतात. मात्र कांचन त्या दोघांना घरात घेणार नाही असं सांगेल. अरुंधती हे सगळ्याकडे दुर्लक्ष करून आईकडे जाण्याच्या  तयारीत असते एवढ्यातच कांचनला अॅटॅक येतो आणि ती जमिनीवर कोसळते कांचनचा आवाज ऐकून अरूंधती माघारी  वळते आणि घरात शिरताना तिच्याकडून संजना साठी निलीमाने ठेवलेले माप ओलांडले जाते.

‘आई कुठे काय करते!’ आता पुढे काय होणार? अरुंधती, अनिरुद्ध आणि संजना एकाच घरात नांदणार का? आपल्या नवऱ्याचा नवीन संसार अरुंधती पाहू शकेल का? हे पुढे येणाऱ्या भागात कळेल. ‘आई कुठे काय करते!’ या मालिकेत दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट येत आहेत त्यामुळे आता प्रेक्षक पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत.