‘आई कुठे काय करते’ मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्याची ‘या’ कारणामुळे एक्झिट!

सध्या या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. सध्या या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. पण या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेतील अरुंधतीच्या मुलाची भूमिका साकारणारा यश म्हणजे अभिनेता अभिषेक देशमुख काही दिवसांसाठी मालिकेतून एक्झिट घेणार आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे कथानक सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. या मालिकेत एका बाजूला अरुंधतीने घराचा काही हिस्सा गहाण ठेवल्याचे देशमुख कुटुंबाला समजते. तर दुसरीकडे अरुंधतीचा मुलगा यश हा कामानिमित्त १० दिवस बाहेरगावी जाणार असल्याचे दाखवलं जात आहे. मात्र सध्या अभिनेता अभिषेक देशमुख हा लंडनमध्ये मजा मस्ती करताना दिसत आहे.

अभिषेक देशमुख याने त्याच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढत कुटुंबासोबत परदेशात फिरायला गेला आहे. सध्या अभिषेक हा त्याच्या कुटुंबासोबत लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. त्याने त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामुळे पुढील काही दिवस अभिषेक या मालिकेत दिसणार नाही. यश म्हणजे अभिनेता अभिषेक देशमुख काही दिवसांसाठी मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचे कळताच या मालिकेचे चाहते नाराज झाले आहेत.

दरम्यान या मालिकेतील यशचे पात्र सर्वांचे फार लाडके ठरत आहे. आईच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणारा, घरातील जबाबदाऱ्या पार पाडणारा, भाऊ-बहिणीची काळजी घेणारा, समजुतदार यश सर्वांना भावतो आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मालिकेत यश दिसणार नसल्यामुळे अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aai kuthe kay karte fame yash actor abhishek deshmukh took break from serial know the reason nrp