‘आई कुठे काय करते’ मालिकेत होणार नव्या पात्राची एण्ट्री?

या नवीन पात्राच्या एण्ट्रीनंतर अरुंधती तिचा निर्णय बदलणार का?

aai kuthe kay karte marathi serial update
अरूंधतीचा देशमुख कुटुंबातील हा शेवटचा सोहळा असणार आहे.

स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते?’मध्ये दररोज काही ना काही नवे घडत आहे. आता अरूंधती आणि अनिरूद्धच्या घटस्फोटाला अवघा एक आठवडा आहे. आपण जाण्याअगोदर यश आणि गौरीचा साखरपुडा व्हावा ही अरूंधतीची मनापासूनची इच्छा. या इच्छेला आजी देखील परवानगी देते. अरूंधतीचा देशमुख कुटुंबातील हा शेवटचा सोहळा. आता या सोहळ्यात एका नव्या पात्राची एन्ट्री होते.

‘समृद्धी’ बंगल्यात गौरी-यशच्या साखरपुड्याची जय्यत सुरू आहे. अशावेळी आतापर्यंत कधीच न दाखवलेलं पात्र पहिल्यांदाच सगळ्यांसमोर येणार आहे. आप्पा देशमुख यांचा दुसरा मुलगा आणि अनिरूद्धचा लहान भाऊ अविनाशची या मालिकेत एण्ट्री होणार आहे. आतापर्यंत  अविनाश देशमुख हे पात्र मालिकेत दाखवण्यात आलं नाही. पहिल्यांदाच अविनाश देशमुख प्रेक्षकांना भेटणार आहे. अभिनेता शंतनु मोघे अविनाश देशमुखचं पात्र साकारणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आणखी वाचा : ‘मला तैमूरची शी साफ करता येत नव्हती, मी एक परिपूर्ण आई नव्हते…’, करीनाने केला खुलासा

अविनाश आणि अनिरूद्ध पंजा लावताना दिसत आहेत. अनिरूद्ध अविनाशला म्हणतो की,’मी जिंकलो तर काय देशील?’ त्यावर अविनाश म्हणतो,’तू मागशील ते.. आणि हरलास तर जे मी मागेन ते देखील?’ त्यावर अनिरूद्ध म्हणतो,’ते बघू नंतर…’ या दोघांमध्ये पंजा लावण्यात येतो. अविनाश अनिरूद्धला हरवतो… ठरल्याप्रमाणे जो जिंकेल तो काही तरी मागेल त्याप्रमाणे अविनाश अनिरुद्धला म्हणतो, ‘काय हवं ते माग?’ यानंतर अविनाश हात जोडून,’दादा या घरच्या लक्ष्मीला थांबवं.’

आणखी वाचा : ‘तुला हे करावं लागेल…’, ‘मोमो’ने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

अविनाश आणि अनिरूद्ध यांच्या या संवादानंतर सगळेच स्तब्ध होतात. अरूंधती आणि अनिरूद्ध यांचा घटस्फोट व्हावा असं कुणालाच वाटत नसतं. मात्र अरूंधतीने आता आपल्या मनाची तयारी केली आहे. तर दुसरीकडे संजना गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे. या सगळ्यात अनिरूद्ध मात्र ठाम निर्णयापर्यंत पोहोचलेला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aai kuthe kay karte marathi serial update a news character will enter in arundhati and anirudhs life dcp