‘आई कुठे काय करते!’ ही मालिका छोट्या पडद्यावरील छोट्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका आता एका महत्त्वाच्या टप्यावर आली आहे. अरुंधती आणि अनिरुद्धचा घटस्फोट झाला. तर गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण जगापासून लपून असलेल्या अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्याला आता एक ओळख मिळणार आहे. आज ३० ऑगस्ट रोजी संजना आणि अनिरुद्ध यांच लग्न होणार आहे. मात्र, या सगळ्यात आता संजनाने अनिरुद्धच्या कानशिलात लगावली आहे.

संजना आणि शेखरचा घटस्फोट झाला. त्यानंतर संजना अनिरुद्धच्या पाठी लग्न कर म्हणून लागते. मात्र, धर्म संकटात असलेला अनिरुद्ध होकार किंवा नकार देत नाही. संजना त्याची कोणतीही गोष्ट न ऐकता लग्नाच्या तयारीला लागते. रजिस्टाररा तर संजना देशमुखांच्या घरी म्हणजे त्यांच्या समृद्धी बंगल्यावर बोलावते. मात्र, लग्नाच्या आधल्या रात्री अनिरुद्ध घरातून पळ काढतो. त्यावेळी यश अनिरुद्धला पाहतो पण तो याकडे लक्ष देत नाही.

संजनाला या विषयी काही माहित नसते आणि ती आनंदाने तयार होऊन नववधुच्या वेशात त्याची वाटपाहत असते. पण, अनिरुद्ध तिचा फोन उचलत नाही. हे पाहता संजना देशमुखांच्या घरी गोंधळ घालते. एवढंच नाही तर ती त्यांनीच अनिरुद्धला लपवून ठेवलं असणार असा आरोप करते. त्यानंतर संजना अरुंधीतवर देखील आरोप लावते. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाला संजनाचा राग येतो आणि ते तिच्यावर भडकतात. त्यावेळी संजनाची मानसिक परिस्थिती ठीक नसल्याने ती हे सगळं बोलत असल्याचे गौरी सगळ्यांना सांगते.

आणखी वाचा : ‘याला म्हणतात अश्लीलता…’, निकसोबतच्या त्या फोटोमुळे प्रियांका झाली ट्रोल

संजना पुढे अरुंधतीला फोन करते आणि म्हणते मी अनिरुद्ध आणि त्याच्या कुटुंबा विरोधात पोलिसात तक्रार दाखल करेन अशी धमकी देते. हे ऐकल्यानंतर अरुंधती शांत बसत नाही आणि म्हणते माझ्या कुटुंबाकडे बोट दाखवलं तर मी बोट तोडेन.

आणखी वाचा : करिश्मा आणि करीनाच्या शाळेची फी भरण्यासाठी देखील पैसे नव्हते- रणधीर कपूर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर अरुंधती घरी येते तर पाहते संजना इथे ही पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकी देत असते. हे पाहिल्यानंतर अरुंधती म्हणते, जा, कर पोलिसात तक्रार. तू माझा, माझ्या कुटुंबाचा छळ केला असं मी पोलिसात सांगेन. अरुंधतीच हे बोलण ऐकल्यानंतर संजना शांत होते. तेवढ्यात अनिरुद्धचा अरुंधतीला फोन येतो आणि तो म्हणतो, मला तुझ्या एकटीशी बोलायचं आहे. आपण घरा बाहेर भेटूया का? मात्र घरात सुरु असलेला गोंधळ पाहता अरुंधती त्याला घरी येण्याचा आग्रह करते आणि इथे सगळे आहेत सांगते. घरी आल्यानंतर अनिरुद्ध संजनाच्या नजरेला नजर मिळवू शकत नाही. तर अनिरुद्ध दुसऱ्यांदा लग्नाच्या दिवशी पळून गेल्याने संजना त्याच्या कानशिलात लगावते.