अक्षयने सोडलेली ‘ही’ भूमिका आमिरच्या पदरात?

दिग्दर्शकासोबत झालेल्या मतभेदांमुळे अक्षय कुमारने टी सीरिजच्या या चित्रपटात भूमिका साकारण्यास नकार दिला होता.

aamir akshay
आमिर खान, अक्षय कुमार

दिग्दर्शकासोबत झालेल्या मतभेदांमुळे अभिनेता अक्षय कुमारने आगामी ‘मोगुल’ चित्रपटात भूमिका साकारण्यास नकार दिला. चित्रपटासाठी घेतलेली रक्कमसुद्धा त्याने निर्मात्यांना परत केली. यानंतर टी सीरिजचे भूषण कुमार आणि अक्षय यांच्यात कटूता निर्माण झाली. अक्षयच्या या निर्णयाने भूषण कुमार नाराज होत दुसरा एखादा सुपरस्टार निवडेन असं त्यांनी ठरवलं आणि ठरल्याप्रमाणेच त्यांनी आता या चित्रपटासाठी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खानकडे विचारणा केल्याचं समजतंय.

‘टी सीरिज’चे सर्वेसर्वा दिवंगत गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. काही महिन्यांपूर्वी अक्षयने या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूकसुद्धा सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र, काही मतभेदांमुळे ऐनवेळी चित्रपटातून काढता पाय घेत अक्षयने निर्मात्यांकडून घेतलेली काही रक्कमसुद्धा परत केली. ‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार आमिरला ‘मोगुल’ या चित्रपटासाठी विचारण्यात आलं असून त्याने पटकथेत काही बदल सुचवले आहेत. या चित्रपटाची ऑफर स्विकारल्याचं आमिरने अधिकृतपणे काहीच सांगितलं नसून त्याने सुचवलेल्या बदलांवर निर्माते काम करत आहेत.

Video: शाहिद कपूरच्या भावाचा अफलातून डान्स पाहाच!

आमिर ‘मोगुल’ या चित्रपटाची सहनिर्मितीही करणार असल्याचं म्हटलं जात आहे. टी सीरिज आणि आमिरकडून याची अधिकृत घोषणा कधी करण्यात येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या आमिर त्याच्या आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aamir khan replaces akshay kumar in gulshan kumar biopic mogul

ताज्या बातम्या