आमिरची मुलगी इरा तिच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत आहे. ज्याप्रमाणे आमिर सामाजिक कार्यांशी निगडीत राहतो त्याचप्रमाणे आता इराही प्राण्यांच्या कल्याणसाठी आपला पाठिंबा देणार आहे. याकरिता ती सेलिब्रेटी फुटबॉल मॅचचे सूत्रसंचालन करणार आहे.
इराला आणि ती मदत करत असलेल्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सेलिब्रेटी या फुटबॉल मॅचमध्ये सहभाग घेणार आहेत. यामध्ये हृतिक रोशन, अभिषेक बच्चन, टायगर श्रॉफ हे यांचाही सहभाग असणार आहे. तसेच, क्रिकेटचा देव असणारा सचिन तेंडुलकरदेखील या मॅचचा एक भाग राहणार असल्याचे म्हटले जात आहे. या मॅचद्वारे जमा केला जाणारा निधी हा इराने निवडलेल्या एनजीओला दिला जाईल. हे एनजीओ प्राण्यांना घर मिळवून देण्यात मदत करेल. निधी जमा करण्यासाठी खेळाचे आयोजन करण्याची आमिरच्या मुलांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, आमिरचा मोठा मुलगा जुनैद याने महाराष्ट्रातील अल्पसुविधा प्राप्त लोकांसाठी निधी जमा व्हावा म्हणून क्रिकेट मॅचचे आयोजन केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jun 2014 रोजी प्रकाशित
आमिरची मुलगी इरा करणार सेलिब्रेटी फुटबॉल मॅचचे सूत्रसंचालन
आमिरची मुलगी इरा तिच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत आहे.
First published on: 20-06-2014 at 01:31 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khans daughter ira to host celebrity football match