गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्या वादामुळे अनेकजण कंगनापासून चार हात लांबच राहू लागले आहेत. कंगना- हृतिकच्या या वादात आदित्य पांचोली, अध्ययन सुमन, करण जोहर, रणबीर कपूर आणि सलमान खान यांचीही नावे जोडली गेली आहेत. कंगनाने ज्या पद्धतीने एका टीव्ही मुलाखतीत तिच्यावरचे आरोप खोटे असल्याचे म्हटले त्याचप्रमाणे हृतिकनेही वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून आपली बाजू मांडली. या दोघांच्या भांडणात बॉलिवूडमध्ये दोन गट पडले आहेत. हृतिकच्या मुलाखतींनंतर अनेक सेलिब्रिटींनी त्याची बाजू घेतली. हा गट कंगनाकडे दुर्लक्ष करू लागला आहे, तिला टाळू लागला आहे. अप्रत्यक्षपणे काही पार्ट्यांमधूनही तिला वगळण्यात आल्याचं पाहायला मिळालं. पण अशातही बॉलिवूडची एक व्यक्ती मात्र तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. कंगनाला आमिर खानची साथ मिळाली आहे. अप्रत्यक्षपणे त्याने कंगनाला पाठिंबा दिला आहे असंच चित्र सध्या समोर येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : कोयना मित्राकडून मैत्रिणीची फसवणूक

आमिरच्या आगामी ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग मुंकेश अंबानींच्या अँटिला या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. अंबानींच्या घरी अनेकदा चित्रपटांचे स्पेशल स्क्रीनिंग होतात. निवडक सेलिब्रिटी तेव्हा उपस्थित असतात. ‘सिक्रेट सुपरस्टार’च्या स्क्रीनिंगला मात्र बड्या स्टार्सपैकी फक्त कंगना उपस्थित होती. करण जोहर आणि हृतिक अनुपस्थित होते. आमिरची पत्नी किरण रावसोबत फक्त कंगनाच स्क्रीनिंगला पोहोचली होती. कदाचित कंगनाला बहिष्कृत करणं आमिरला योग्य वाटलं नसावं. म्हणूनच त्याने कंगनाला आवर्जून निमंत्रित केलं असावं असं म्हटलं जातंय.

काही दिवसांपूर्वी अभिनेता डिनो मोरीयाने आयोजित केलेल्या एका ग्रँड पार्टीला कंगनाला बोलावलं नव्हतं. हृतिक आणि करण या पार्टीला उपस्थित राहणार असल्याने कंगनाचं नाव पार्टीतून वगळण्यात आलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir stands by kangana ranaut as bollywood boycotts her
First published on: 17-10-2017 at 21:06 IST