माझी अडीच वर्षांची मुलगी आराध्या ही माझी फिटनेस ट्रेनर आहे, असे बॉलीवूड सुंदरी आणि यमी मम्मी ऐश्वर्याने म्हटले आहे. संजय गुप्ताच्या जझबा चित्रपटाने ती पुनरागमन करत असून, प्रो कबड्डी लीगमध्ये तिचे कमनीय बांध्यातील रुप पाहायला मिळाले. ऐश्वर्याच्या फिटनेसचे रहस्य विचारले असता, “ती फिटनेससाठी काहीच करत नाही, तिला देवाकडूनच मिळाले आहे,” असे अभिषेक खोडकरपणे म्हणाला. पण, पुन्हा एकदा हा प्रश्न विचारल्यावर आपल्या फिटनेसच्या मागचे कारण आराध्या असल्याचे ऐश्वर्या म्हणाली. ऐश्वर्याने कान चित्रपट महोत्सवातील आपल्या मत्सकन्या रुपाने चाहत्यांना आणि तिच्याविरुद्ध बोलणा-यांना स्तब्ध करून टाकले होते. या सुंदरीने रॉबर्टो कॅवेली फिशटेल गाउन परिधान केला होता. त्यात ओठांवर गडद लाल रंगाची लिपस्टिक आणि नखांच्या रंगाने आणखीनच खुलून दिसलेल्या ऐशचे हे रुप पाहून सर्वांचेच तोंड बंद झाले होते.
प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या दिवशी ऐश्वर्या पती अभिषेक बच्चनसोबत एनएससीआय स्टेडियममध्ये उपस्थित होती. जयपूर पिंक पॅन्थर संघाचा अभिषेक बच्चन संघमालक आहे. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान, आमिर खान, सचिन तेंडुलकर हेदेखील या सामन्याला उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jul 2014 रोजी प्रकाशित
आराध्या माझी फिटनेस ट्रेनर- ऐश्वर्या
माझी अडीच वर्षांची मुलगी आराध्या ही माझी फिटनेस ट्रेनर आहे, असे बॉलीवूड सुंदरी आणि यमी मम्मी ऐश्वर्याने म्हटले आहे.

First published on: 28-07-2014 at 02:15 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaradhya is my fitness trainer aishwarya rai bachchan