गायिका आर्या आंबेकर ही मराठी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्या घराघरांत पोहोचली. गायन क्षेत्राप्रमाणेच आर्याने अभिनयातही आपले नशीब आजमावले. आई श्रुती आंबेकर यांच्याकडून आर्याने गायनाचे धडे घेतले. साडेपाच वर्षांची असताना तिने आपल्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली आणि वयाच्या सहाव्या वर्षी पहिली परीक्षा दिली. त्यामुळे आर्या आपल्या मधुर आवाजाचे संपूर्ण श्रेय नेहमीच आपल्या आईला देते. आता ‘मदर्स डे’ निमित्ताने तिने आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

‘मदर्स डे’ निमित्त आर्याने खास पोस्ट करीत आपल्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत. “तुला मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा! तू खूप सुंदर आहेस आई,” असे आर्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे. शुभेच्छा देताना आर्याने आपल्या आईला तिने स्वत: गायलेले खास गाणे समर्पित केले आहे. ‘आई पहिला संस्कार’ हे आईची महती सांगणारे गाणे चार वर्षांपूर्वी रिलीज करण्यात आले होते. हे गाणे आर्याने गायले असून अरुण सांगोळे यांनी लिहिले आहे.

हेही वाचा : ‘मेट गाला’ मध्ये रॅम्पवॉकचा अनुभव सांगताना आलिया म्हणाली, “मी रेड कार्पेटवर पडणार…”

‘आई पहिला संस्कार’ या संपूर्ण गाण्यात आईची महती सांगत तिचे आभार मानून, आईचा सन्मान केला आहे. आर्याच्या आयुष्यातही तिच्या आईचा सर्वाधिक प्रभाव असल्याने तिने हे गाणे आपल्या आईला समर्पित केले आहे. आर्या आपल्या आईसोबत नेहमीच विविध फोटो शेअर करीत असते. यापूर्वीही “आई… माझ्या आयुष्यात तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही,” अशा प्रकारची पोस्ट आर्याने केली होती.

हेही वाचा : उत्सवमूर्ती परिणीती, पण थाट प्रियांकाचा! बहिणीच्या साखरपुड्यात देसी गर्लने नेसलेल्या साडीची किंमत तब्बल…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे शीर्षकगीत सुद्धा आर्यानेच गायले असल्याने ‘मदर्स डे’ निमित्त तिच्या अनेक चाहत्यांनी आर्याला सोशल मीडियावर टॅग करीत तिच्या सुमधुर आवाजाचे कौतुक केले आहे.