बॉलिवूड अभिनेता आणि जेष्ठ अभिनेते धर्मेन्द्र यांचा पुतण्या अभय दोओल याला ‘वन बाय टू’ चित्रपटाच्या निर्मितीनंतर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे वृत्त आहे. मिड-डे डॉट कॉमच्या वृत्तानुसार ‘वन बाय टू’ चित्रपटासाठी अभय देओलने मुंबईतील जुहू परिसरात असलेली त्याची एक सदनिका गहाण ठेवली होती. पांडुरंग वाडीतील पांडुरंग सहकारी गृहसंस्थेत असलेल्या ह्या सदनिकेची किंमत जवळजवळ २ ते ३ कोटी इतकी आहे. असे असले तरी कर्जाच्या रक्कमेबाबतची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. ‘वन बाय टू’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल पडला. संगीत कंपनीबरोबर झालेल्या वादामुळे चित्रपटाच्या संगीतातूनदेखील काहीही फायदा होऊ शकला नाही. या वर्षी जानेवारी महिन्यात पार पडलेल्या ‘२०व्या लाईफ ऑके स्क्रिन पुरस्कार सोहळ्या’दरम्यान अभय देओलने डोळ्याला मार लागलेल्या मोकअपसह कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन करून सदर संगीत कंपनीबाबतचा आपला विरोध दर्शविला होता. ८ कोटीचे बजेट असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अन्य पाच जणांबरोबर मिळून करण्यात आली होती. अभय देओलने आपली सदनिका गहाण ठेऊन या चित्रपटासाठी पैसे उभे केले होते. सध्या अभय सांताक्रुझ येथील त्याच्या अन्य घरात राहात असल्याचे अभयच्या जवळच्या सुत्रांकडून समजले. जर अभय सदर कर्ज भरण्यास असमर्थ ठरला, तर बँकेकडे गहाण असलेल्या अभयच्या सदनिकेचा लिलाव करून बँककडून कर्जाची वसुली करण्यात येईल.
संग्रहित लेख, दिनांक 24th Mar 2014 रोजी प्रकाशित
अभय देओलसमोर आर्थिक अडचणी
बॉलिवूड अभिनेता आणि जेष्ठ अभिनेते धर्मेन्द्र यांचा पुतण्या अभय दोओल याला 'वन बाय टू' चित्रपटाच्या निर्मितीनंतर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे वृत्त आहे.

First published on: 24-03-2014 at 04:27 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhay deol mortgages his flat faces financial crisis after the debacle of debut production