अभिनेता अभिजित खांडकेकर (Abhijeet khandekekar) आणि अभिनेत्री सुखदा खांडकेकर (Sukhda khandekar) यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यापैकी एक आहे. अभिजित आणि सुखदा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतेच त्या दोघांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी नवीन घर घेतल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अभिजित आणि सुखदाने मुंबईत नवीन घर घेतलं आहे. त्याचे फोटो त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर केले आहेत. या सेलेब्रेटी कपलने मोठ्या थाटामाटात आपल्या नव्या घराचा गृहप्रवेश सोहळा पार पाडला. या दोघांनी पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने सर्व पूजाविधी पार पाडल्या. या समारंभात त्यांच्या कुटुंबातील लोक आणि इंडस्ट्रीतील काही जवळचे लोक उपस्थित होते.

आणखी वाचा : ‘सरसेनापती हंबीररावां’चे साऊथ स्टाईल स्वागत, कर्नाटकात पोस्टरवर केला दुग्धाभिषेक

आणखी वाचा : जेव्हा माधुरी, सलमान आणि शाहरुख एकत्र येतात…, फोटो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिजित सध्या ‘तुझेच गीत गात आहे’ या मालिकेत काम करत आहे. तर सुखदा ‘पुण्यश्लोक आहिल्याबाई’ या हिंदी मालिकेत काम करत आहे. त्या दोघांनी शेअर केलेले घराचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.