‘क्लायंट और मौत कभीभी बुला सकते है’, अभिषेक बच्चनच्या ‘बॉबी बिस्वास’चा ट्रेलर प्रदर्शित

अभिषेक बच्चनच्या अभिनयाची प्रशंसा होत आहे.

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या वेब सीरिज, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अलिकडेच त्याची ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर आता ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटात तो झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधील अभिषेकचा अभिनय पाहून सोशल मीडियावर प्रशंसा केली जात आहे.

‘बॉब बिस्वास’ चित्रपटाच्या दोन मिनिटे एकोणचाळीस सेकंदाच्या ट्रेलरमध्ये बॉब बिस्वासचा प्रवास दाखवण्यात आला आहे. बॉब बिस्वास कोमामधून बाहेर येतो आणि त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्याचे दाखवण्यात आले. त्याला त्याचे कुटुंबीय तसेच भूतकाळाविषयी काही माहिती नसते. तो खरच सगळं विसरला आहे की त्यामागे काही कारण आहे हे प्रेक्षकांना चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिषेक बच्चन एकदम वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे.
आणखी वाचा : मी कमावलेले ७० टक्के पैसे संपत्तीच्या व्यवहारात गमावले; सैफचा धक्कादायक खुलासा

‘बॉब बिस्वास’ या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबतत चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, अभिषेकने या आधी लुडो या चित्रपटाच काम केले. करोना काळामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Abhishek bachchan is a reluctant contract killer bob biswas trailer avb