एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी जोडी म्हणजे अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिनेता सैफ अली खान. आता जवळपास १२ वर्षांनंतर सैफ आणि राणी मुखर्जी पुन्हा एकत्र दिसणार आहेत. ते ‘बंटी और बबली २’ या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे त्यांना एकत्र पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी सैफने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने एका प्रॉपर्टी डिलमध्ये जवळपास ७०% पैसे गमावल्याचे सांगितले आहे.

सध्या सैफ आणि राणी ‘बंटी और बबली २’चे प्रमोशन करत आहेत. यश राज फिल्मने त्या दोघांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ सैफ आणि राणी जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. दरम्यान, सैफने काही वर्षांपूर्वी एका प्रॉपर्टी डिलमध्ये कमावलेल्या पैशांपैकी ७० टक्के पैस गमावल्याचा धक्कादायक खुलासा केला. ‘मला तिन वर्षात एक प्रॉपर्टी मिळणार होती असे सांगण्यात आले होते. पण ती अद्याप मिळालेली नाही. मी जवळपास त्या प्रॉपर्टीसाठी त्यावेळी कमावलेल्या पैशांपैकी ७० टक्के गमावले’ असे सैफ म्हणाला.
आणखी वाचा : ‘राणी मुखर्जीला किस करणे…’, सैफ अली खानने सांगितला धक्कादायक अनुभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या १९ नोव्हेंबरला ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी राणी आणि सैफने ‘हम तुम’, ‘तारा रम पम’ आणि ‘थोडा प्यार थोडा मॅजिक’ चित्रपटात एक दिसले होते. आता जवळपास १२ वर्षांनंतर ते पुन्हा ‘बंटी और बबली २’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहेत.