दाक्षिणात्य अभिनेते आपल्या अभिनेत्या अभिनयाच्याबरोबरीने आपल्या सामाजिक कामांसाठी ओळखले जातात. विक्रांत रोना चित्रपटामुळे चर्चेत आलेला अभिनेता म्हणजे किचा सुदीप. कन्नड चित्रपटसृष्टीत त्येनं स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. किचा आता एका वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. प्राणी संवर्धनासाठी त्याने एक मोठे पाऊल उचलेले आहे.

किच्चा सुदीपने गुरवारी असे जाहीर केले की पुण्यकोटी दत्तू योजनेतून कर्नाटकातिल प्रत्येक जिल्ह्यातून एकूण ३१ गायी दत्त घेणार आहे. या योजनेचे उद्दिष्ट असे आहे की जनतेच्या मदतीने गौशालाना आर्थिकरित्या विकसित व्हावे. पशुपालन मंत्री प्रभू बी चौहान यांच्या निवासस्थानी त्याने गौपूजा केली आहे. याबद्दल सुदीपने आपली प्रतिक्रिया दिली आहे, तो असं म्हणाला की “सरकारने मला या योजेनसाठी ब्रँड अँबेसेडर बनवून माझ्यावर एक मोठी जबाबदारी टाकली आहे. यासाठी मी माननीय मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि प्रभू चौहान यांचे आभार मानतो.” अशा शब्दात त्याने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Karnataka CM Siddaramaiah calls PM Modi nalayak loksabha election 2024
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना म्हटले ‘नालायक’; ‘चंबू’वरुन राजकारण का तापलंय?
ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
chandrapur lok sabha marathi news, devendra fadnavis chandrapur lok sabha marathi news
मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा ‘मेकओव्हर’ करतील; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!

किच्चा सुदीप मूळचा म्हैसूर येथील एका गावातला असून त्याने अभिनयांत्रिकीत शिक्षण घेतले आहे. त्याने १८ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला आहे. अभिनयाची आवड असल्याने तो मुंबईत आला. रीतसर अभिनयाचे प्रशिक्षण घेऊन त्याने करियरला सुरवात केली. थायव्वा या कन्नड चित्रपटात त्याने पहिल्यांदा काम केले. ‘दबंग ‘३, ‘रक्तरचरित्र’सारख्या हिंदी चित्रपटात त्याने काम केले आहे.