टायफॉइड झाल्याने दीपिकासोबतच्या या क्षणांना मुकणार रणबीर

कतरिना कैफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याच्या लव्ह लाइफला उतरती कळाच लागली आहे. हे सर्व कमी की काय आता त्याच्या आरोग्याच्याही तक्रारी सुरू झाल्या आहेत.

दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या आयुष्यातील संकटं काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीत. एका मागोमाग एक फ्लॉप सिनेमांमुळे तो चिंताग्रस्त आहे. खासगी आयुष्यातही त्याला अनेक संकंटांचा सामना करावा लागत आहे. कतरिना कैफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याच्या लव्ह लाइफला उतरती कळाच लागली आहे. हे सर्व कमी की काय आता त्याच्या आरोग्याच्याही तक्रारी सुरू झाल्या आहेत. रणबीरला टायफॉइडची लागण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो अयान मुखर्जीच्या ब्रम्हास्त्र सिनेमासाठी डाएट करत होता.

डेक्कन क्रोनिकलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आता रणबीरला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पथ्य पाळावं लागणार आहे. या काळात त्याच्या व्यायामावरही बंदी घालण्यात आली आहे. जास्तीत जास्त आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. टायफॉईडमुळे आता तो शबाना आझमी यांच्या महत्त्वकांक्षी फॅशन शोलाही उपस्थित राहू शकणार नाही. मिझवान गावात होणाऱ्या या फॅशन शोमध्ये तो दीपिका पदुकोणसोबत रॅम्प वॉक करणार होता. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे आता या शोवरही त्याला पाणी सोडावं लागणार आहे.

रणबीरच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, २०१५ मध्ये आलेला तमाशा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. या सिनेमानंतर त्याचा एकही सिनेमा हिट ठरलेला नाही. ‘ऐ दिल है मुश्किल’, ‘जग्गा जासूस’ या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर निराशा केली. त्याच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर माधुरी दीक्षितचा पहिला मराठी सिनेमा बकेट लिस्टमध्ये तो पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. या सिनेमासोबतच ब्रम्हास्त्र आणि संजय दत्तच्या बायोपिकमध्येही तो दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actor ranbir kapoor diagnosed with typhoid will not be able to ramp walk with deepika padukone