scorecardresearch

Premium

‘केडी-द डेव्हिल’ चित्रपटात बॉम्बस्फोटाचा सीन शूट करताना संजय दत्त जखमी

बॉम्बस्फोटाच्या सीक्वेन्सचे शूटिंग सुरू होते. या दरम्यान स्फोट झाला आणि संजय जखमी झाला आहे.

sanjay dutt

संजय दत्त गेली अनेक वर्षे त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आला आहे. गेले काही दिवस तो त्याच्या आगामी चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहे. आता अशाच एका त्याच्या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो जखमी झाल्याचे समोर आले आहे.

संजय दत्त सध्या त्याच्या आगामी ‘केडी – द डेव्हिल’ या कन्नड चित्रपटाचे शूटिंग करत आहे. हे शूटिंग बेंगळुरूजवळ सुरू आहे. आज बॉम्बस्फोटाच्या सीक्वेन्सचे शूटिंग सुरू होते. या दरम्यान या बॉम्बस्फोटाचे शूटिंग करताना स्फोट झाला आणि संजय जखमी झाला आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

आणखी वाचा : “आता दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणार…” संजय दत्तचं विधान चर्चेत; बॉलिवूडकरांनाही सुनावलं

मीडिया रिपोर्टनुसार, ॲक्शन डायरेक्टर डॉ. रवि वर्मा यांच्या ‘केडी: द डेव्हिल’ या चित्रपटासाठी एक ॲक्शन सीन बसवत होते. बॉम्बस्फोट झाला आहे असा एक सीम यावेळी चित्रीत होणार होता. मात्र त्यावेळी खरोखर एक स्फोट झाला आणि संजयचे कोपर, हात आणि चेहऱ्यावर खूप जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले.

हेही वाचा : कॅन्सरवर मात, वयाच्या ६३ वर्षी संजय दत्तचा जबरदस्त फिटनेस; व्हिडीओ व्हायरल

त्यानंतर लगेचच संजय दत्तला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याच्या दुखापतीची बातमी कळताच त्याचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. या चित्रपटात तो खालनायकाची भूमिका साकारत आहे, तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor sanjay gets injured while shooting kd the devil film rnv

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×