बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता सोनू सूद कायमच चर्चेत असतो. करोना काळात लॉकडाऊनमध्ये नागरीकांची मदत केल्यामुळे त्याचं सर्वच स्तरातून कौतुक झालं होतं. लॉकडाऊननंतरही सोनू सूदने त्याचं हे मदतीचं कार्य थांबवलेलं नाही. अनेक माध्यमातून तो लोकांच्या मदतीसाठी कायमच धावून जात असतो. यासाठी त्याने संस्थादेखील सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनू सूदने गेल्या वर्षी युपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेसची घोषणा केली होती. ‘डिवाइन इंडिया युथ असोशिएशन’(DIYA) आणि सोनू सूदची संस्था मिळून यावर काम करत आहेत. आयएएस अधिकारी होऊन देशाच्या सेवेत रुजू होणाऱ्या विद्यार्थ्यांना यामार्फत मार्गदर्शन दिले जाणार आहे. यासाठी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. युपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या पण घरची आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. नुकतीच यासाठी सोनू सूदकडून स्कॉलरशिपची घोषणाही करण्यात आली आहे.

हेही वाचा : “रात्रीच्या शोचं तिकीट न मिळाल्यामुळे…”, दिग्दर्शक हंसल मेहता यांनी सांगितला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा अनुभव

DIYA ही दिल्लीतील संस्था युपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे. संस्थेचे मनीष कुमार सिंह या उपक्रमाबद्दल बोलताना म्हणाले, “सोनू सूदची संस्था DIYAबरोबर काम करत आहे, याचा आनंद आहे. यामुळे आयएएस होण्याची इच्छा बाळगून देशसेवेसाठी काम करू इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना आम्हाला मदत करता येईल. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना या कठीण परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश मिळविण्यासाठी सहकार्य करू”.

हेही पाहा >> Photos : मालदीवमध्ये सनी लिओनीचा व्हॅकेशन मूड; बिकिनीतील बोल्ड फोटोंनी चाहत्यांना केलं घायाळ

सोनू सूदनेही या उपक्रमाबद्दल त्याचं मत व्यक्त केलं आहे. “आयएएस अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर त्याला या उपक्रमाच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत युपीएससीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आम्हाला ज्ञान द्यायचे आहे. कारण ज्ञान हीच ताकद आहे”, असं तो म्हणाला.

हेही वाचा : ‘तारक मेहता का…’ मालिकेत नव्या कलाकाराची एन्ट्री; ‘आश्रम ३’ फेम अभिनेता शैलेश लोढा यांच्या भूमिकेत दिसणार

सोनू सूदने अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘फतेह’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनू सूद काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor sonu sood foundation annouced scolarship and free online coaching program for ias upsc student kak
First published on: 13-09-2022 at 11:01 IST